अखेर राखी सावंतच्या आईची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

ड्रामा क्विन अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) हि सोसिअल मीडियाच्या माध्यमातून सर्वांचे मनोरंजन करत असते. आणि आपल्या चाहत्यांन सोबत प्रत्येक गोष्टी बद्दल अपडेट देत असते. काही दिवसांपासून राखीच्या आई जया भेडा ह्यांना कॅन्सरने ग्रासले त्यानंतर त्यांना कर्करोगाचे निदान झाले. त्यांच्यावर उपचार हे सुरु होते पण त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. राखीच्या आईचं शनिवारी प्रदीर्घ आजारानं निधन झालं. गेल्या तीन वर्षांपासून त्यांना कर्करोगानं ग्रासलं होतं. अनेक दिवसांपासून यावर त्या उपचार घेत होत्या, पण अखेर शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली.राखीनं स्वतः आपल्या आईचं निधन झाल्याची माहिती दिली आहे.
अभिनेत्री राखी सावंतने म्हटलं, “मल्टिऑर्गन फेल्युअर झाल्यानं आईची प्रकृती गंभीर बनली होती. तिला पोटाचा कॅन्सर झाला होता तो तिच्या किडनी आणि फुफ्फुसांपर्यंत पोहोचला होता”जुहूच्या सिटी केअर रुग्णालयात राखीच्या आईवर उपचार सुरु होते, याच ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आईच्या या शेवटच्या क्षणी राखी आई जवळच होती. गेल्या तीन वर्षांपासून राखीची आई कर्करोगाशी झुंज देत होती.

Leave A Reply

Your email address will not be published.