भरदिवसा घरफोड्या करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात…

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहर, भुसावळ, चाळीसगाव तसेच औरंगाबाद, नाशिक, पुणे या जिल्ह्यामध्ये विविध अपार्टमेंटमध्ये घुसून भरदिवसा घरफोडी करुन चोरी करणारी अट्टल गुन्हेगारांना पकडण्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला यश आलेले आहे. पोलिस अधीक्षक एम. राज कुमार जळगाव यांना गुप्त बातमी मिळाली की, १) जितेंद्र गोकु पाटील, २) अमोल गोकुळ पाटील, ३) पवन ऊर्फ पप्पु सुभाष पाटील, ४) सागर लक्ष्मण देवरे, स रा. मोहाडी ता. जामनेर, ५) आकाश सुभाष निकम, ६) महेंद्र ज्ञानेश्वर बोरसे, अ.नं ५ ते ६ रा.नांद्रा पाचोरा, ७) अमोल सुरेश चव्हाण रा. सामनेर ता. पाचोरा यांचे कडेस चोरीच्या गुन्हयांत सोन्या-चांदीचे दागिने व त्यांचे कडे असलेल्या कारला ते नेहमी वेगवेगळ्या नंबर प्लेट लावून फिरतात. त्याप्रमाणे किसन नजनपाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव या आपले अधिपत्त्याखालील पथके निर्माण करुन सदर आरोपींचे शोधकामी रवाना केले. पथकांनी संशयीत आरोपीतांपैकी १) सागर लक्ष्मण देवरे, सर्व रा. मोहाडी ता. जामनेर, २) आकाश सुभाष निकम, अमोल सुरेश चव्हाण, ४) महेंद्र ज्ञानेश्वर बोरसे यांना ताब्यात घेऊन त्यांचेकडे चौकशी करत असतांना आरोपींनी सांगितले की, १) जितेंद्र गोकुळ पाटील, २) अमोल गोकुळ पाटील, ३) पवन ऊर्फ पप्पु सुभा पाटील, ४) सागर लक्ष्मण देवरे, सर्व रा. मोहाडी ता. जामनेर, ५) आकाश सुभाष निकम, ६) महेंद्र ज्ञानेश्व बोरसे, अ.नं. ५ ते ६ रा.नांद्रा ता. पाचोरा यांनी सर्वानी मिळून गेले २-३ वर्षांपासून कधी तिन जण कधी चार जण, तर कधी पाच जण असे पांढरे रंगाची स्विफ्ट डिझायर, क्रेटा, तसेच अटिंगा या चारचाकी वाहनांचा वापर करुन सदर वाहनांना वेगवेगळ्या पासिंगच्या नंबरप्लेट लावुन जळगाव जिल्हामध्ये विशेषत जळगाव शहर, भुसावळ व चाळीसगाव तसेच औरंगाबाद, नाशिक, पुणे जिल्ह्यामध्ये भरदिवसा विशेषत अपार्टमेंटमध्ये प्रवेश करुन बंद असलेल्या घराचे कुलूप त्यांचेकडील हत्याराने तोडून अनेक घरफोडी केल्या आहेत. अशी कबुली दिलेली आहे.

नमुद आरोपींचे ताब्यातुन ३ लाखाची रोख रक्कम, चांदिचे दागिने, तसेच घरफोडी करण्यासाठी लागणारे विविध हत्यारे, एक गावठी कट्टा व चारचाकी वाहनांच्या वेगवेगळ्या पासिंगच्या २४ नंबरप्लेट असे साहित्य आढळून आले आहेत, तसेच घरफोडीत मिळालेले सोन्याचे दागिने विकण्यासाठी त्यांना अमोल सुरेश चव्हाण रा. सामनेर ता. पाचोरा याने मदत केलेली असुन सदरचे दागिन्यापैकी काही दागिने अमोल चव्हाण याने वेळोवेळी त्याचे ओळखीचे योगेश हनुमंत मोरे (लक्ष्मी ज्वेलर्स) जोशीपेठ, जळगाव तसेच संकेत शशिकांत देशमुख, (स्वस्तीक ज्वेलर्स) जोशीपेठ जळगाव, यांना विकले असुन सदरचे दागिने चोरीचे असल्याचे माहित असुन ते कमी किंमतीत विकत घेत होते. तसेच सदर आरोपीतांपैकी १) जितेंद्र गोकुळ पाटील, २) अमोल गोकुळ पाटील, ३) पवन ऊर्फ पप्पु सुभाष पाटील, सर्व रा. मोहाडी ता. जामनेर हे वाहनांसह फरार झालेले असुन ते पकडले गेल्यास त्यांचेकडून अजुनही बरेच गुन्हे उघड होऊ शकतात तसेच चोरीचे दागिने विकत घेणाऱ्या अजुनही काही सोनारांचे नावे समोर येऊ शकतात.

सदर आरोपीतांकडून जळगाव जिल्हयातील तब्बल ३१ घरफोडीचे गुन्हे उघड झालेले आहेत. तसेच नाशिक, पुणे, औरंगाबाद या जिल्ह्यात सुध्दा वेगवेगळ्या ठिकाणी याच प्रकारच्या घर फोडी चोरी केल्याची आरोपीतांनी कबुली दिलेली आहे. सदरची कारवाई एम. राज कुमार, पोलीस अधीक्षक सो. जळगाव, चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक जळगाव, रमेश चोपडे, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव यांचे मार्गदर्शनाखाली किसन नजनपाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी व त्यांचे अधिपत्त्याखालील पो.उ.नि. गणेश वाघमारे, पो.उ.नि. अमोल देवढे, सफी युनुस शेख, रवि नरवाडे, अनिल जाधव, पो. हे काँ. राजेश मेंढे, संजय हिवरकर, सुनिल दामोदरे, संदिप पाटील, अशरफ शेख, गोरख बागुल, कमलाकर बागुल, जयंत चौधरी, अनिल देशमुख, अक्रम शेख, संदिप सावळे, लक्ष्मण पाटील, दिपक पाटील, पोना संतोष मायकल, प्रितम पाटील, प्रविण मांडोळे, रणजीत जाधव, नंदलाल पाटील, भगवान पाटील, राहुल बैसाणे, परेश महाजन, हेमंत पाटील, ईश्वर पाटील, महेश पाटील, लोकेश माळी, भरत पाटील, प्रमोद ठाकुर, मोतीलाल चौधरी सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव तसेच पोना करुणासागर अशोक जाधव नेम पोलीस मुख्यालय, जळगाव यांनी कारवाई केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.