भडगाव येथे शिवजयंती उत्साहात साजरी

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्व.बापूजी फाउंडेशन तर्फे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांची जयंती व जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दि.19 रोजी सकाळ पासून मोटार सायकल रॅली, शिवपूजन, व आकर्षक देखावा, अस्टगंध ढोल ताशा पथक, नागाई लाईट शो, बँड, डी. जे. फटक्यांची आतिषबाजी करण्यात आली. सायंकाळी आमदार ‘किशोर आप्पा पाटील’, लखीचंद पाटील यांच्या हस्ते शिव पूजन तसेच आरती करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला होता. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मोठा मंदिराचा देखावा उभारण्यात आला आहे. या ठिकाणी शिवप्रेमींनी दिवसभर शिवपूजन, रात्रीपर्यंत शिवप्रेमींनी या ठिकाणी शिवपूजनसाठी व्यवस्था केली होती. त्यामुळे संपूर्ण परिसर शिवमय झाला होता. यावेळी गणेश पाटील, हर्षल पाटील, निलेश पाटील, महेंद्र ततार, पिंटू मराठे, स्वप्नील पाटील, योगेश गंजे, जहांगीर मालचे, यश महाजन, प्रथमेश पाटील, बंटी सोनार, भैय्या पाटील, आदीसह हजारो शिवभक्त उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण महाजन सर यांनी तर आभार आयोजक स्व. बापूजी फाउंडेशन चे संस्थापक लखीचंद पाटील यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.