भोंगऱ्या आवलू शे रे ..! ; सातपुडयात उत्साहाला उधाण

0

धानोरा , लोकशाही न्यूज नेटवर्क
सातपुडयाच्या कुशीत राहणाऱ्या पावरा व बारेला समाजाच्या होळीच्या दिवसात साजरा होणाऱ्या भोगर्‍या सणास दि २८ पासून सुरुवात होत असून या निमित्त पाडया पाडयांवर खास आदिवासी शैलीतील ढोल बासरीचे सुर घूम लागले आहेत होळीच्या तब्बल महीनाभर आधी पासून सुरु होणाऱ्या सणाची तयारी पूर्ण झाली असून सातपुडयात उत्साहाला उधाण आले आहे

वसंत ऋतूच्या आगमनाबरोबर सृष्टीत विविध रंगांची उधळण सुरु होते आणि त्यासोबत रानावनात राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या रंगोत्सवासही सुरुवात होत असते नागरी जिवनात होळीच्या रंगाना जितके महत्व आहे तापेक्षा किती तरी महत्व आदिवासी बांधवांच्य जिवनशैलीत भोगऱ्या या सणाला आहे होळी सणाच्या तब्बल महीनाभर आधी आहे.

आदिवासी पावरा समाजातील नागरिक दांडा विधीवत कार्यक्रम करीत असतात पाच शेणाच्या गोवऱ्या उभ्या करून त्यांना दोऱ्याने बांधले जाते व गोवऱ्यांना खड्डा खोदून एक अखंड सुपारीसह गाडले जाते व नारळ फोडून त्या जागेची विधिवत पूजा केली जाते त्यास दांडा गाडणे म्हणतात सणाच्या आठ दिवस आधी त्या त्या परिसरातील बाजाराला आलेल्या ज्ञात अज्ञात आदिवासी बांधवांच्या कपाळाला गुलाल लावून सण आढवण करून देतात तसेच आपल्या गावाच्या सणात सहभागी होण्याचे आमंत्रणही दिले जाते.

या प्रकारास आदिवासी गुलाल्या हाट ( गुलाल बाजार) म्हणून संभोधतात दि २१ फेब्रुवारी पासून गुलाल्या हाटला सुरुवात होत असून तो २७ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे भोगऱ्या सणास दि. २८ फेबुवारी पासून सुरुवात होत असून तो दि. ६ मार्च पर्यंत चालणार आहे भोंगऱ्या बाजाराच्या दिवशी आपल्या गावात किवा बाजारात आदिवासी बांधव आपपले ढोल थाळी बासरी टिंगरी आदी वाद्य आणतात पायाला घुंगरू बांधतात व डोक्यावर चित्र काढलेली टोपी गळ्यात लहान घुंगरू किवा चमकी टिकल्या लावलेला रुमाल गुंडाळतात व वाद्याच्या तालावर नाचतात भोंगर्‍याच्या दिवशी आदिवासी स्त्रिया व पुरुष एकमेकांना गुलाल लावतात व आनंदाच्या भरात बेधुंत नाचतात सणाचा पुरेपुर आनंद लुटत असतात आदिवासी पावरा समाजात सणाच्या दिवसाच्या महिना ते सव्वा महिन्यापर्यंत मुली पळवून नेणे साखरपुडा करणे विवाह करणे किवा बोलणी करणे आदी प्रकार होत नाही या सणात मुलीला पळवून नेणे अशुभ मानले जात असल्याचे कुड्यांपाणी येथील पावरा समाजाचे पाटील दिलदार वांगंऱ्या पावरा रणदास बारेला थॉमस पवार यांनी सागितले

Leave A Reply

Your email address will not be published.