“सत्संग जल जो कोई पावे, मैलाई सब कटी कटी जावे”;पूज्य पंकजजी महाराज

0

भडगाव, लोकशाही न्युज नेटवर्क

संत बाबा जयगुरुदेव आश्रम मथुरा येथून १४ डिसेंबर २०२२ रोजी शाकाहार व सद्गुणी बनण्याचा संदेश देणे, मद्यपान न करण्याचे आवाहन, अध्यात्मिक चेतना जागृत करणे, सामाजिक एकोपा टिकवून आध्यात्मिक, वैचारिक क्रांतीचे वातावरण निर्माण करणे आणि समाजाची उभारणी करण्यासाठी जयगुरुदेवजी महाराजांचे उत्तराधिकारी आणि संस्थाप्रमुख पूज्य पंकजजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली ६ राज्य ७७ दिवसीय आध्यात्मिक धार्मिक जनजागृती यात्रा, काल ३ जानेवारी सायंकाळी भडगाव येथे सोमनाथ पाटील यांच्या शेतात पोहोचली. यावेळी पंकजजी महाराज यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

आज ४ जानेवारी रोजी सत्संग आयोजित करण्यात आले होते. मंचावर पूज्य पंकजजी महाराजांचे भडगावचे अध्यक्ष (President of Bhadgaon) प्रवीण भिकन पाटील, पाचोरा अध्यक्ष हिरामण सांडू पाटील, पाचोरा भाजप अध्यक्ष अमोल शिंदे, भडगाव भाजप अध्यक्ष अमोल पाटील, सोमनाथ पाटील, विश्व हिंदू परिषदेचे मिलिंद बोरसे, नाना हाडपे, बन्सीलाल पाटील, गोविंद शेलार, शरद हिरे, गणेश वाघ, साजन पाटील, मयुर मालपुरे, धनराज पाटील, पवन मोरे पाटील, विठ्ठल पोपट पाटील, विकास विश्वनाथशेठ भावसार, योगेश कोळी, प्रकाश किसन कणखरे, सहयोगी संगत महाराजगंजचे अध्यक्ष वीरेंद्र कुमार इत्यादींनी पुष्पहार अर्पण करून स्वागत केले. प्रवचनात ते म्हणाले “सत्संग जल जो कोई पावे, मैलाई सब कटी कटी जावे” ही ओळ म्हणत सत्संग हे असे पाणी आहे जिथे कावळा आंघोळ करतो आणि हंस बनतो, संत महात्म्यांचे सत्संग वचन श्रवण केल्याने दुष्कृत्ये दूर होतात आणि सुरत शब्दाचा खरा मार्ग सापडतो असा उपदेश त्यांनी भाविकांना दिला. महाराजांनी भगवंताच्या उपासनेचा खरा मार्ग सांगून तो आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणायला लावला.

Leave A Reply

Your email address will not be published.