पोलीस वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांची भडगाव पोलीस स्टेशनला भेट

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

सौ.सु.गी.पाटील मा.वि. व सौ.ज.ग.पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालय भडगाव या विद्यार्थ्यांनी पोलीस वर्धापन दिवसानिमित भडगाव येथील पोलीस स्टेशनला भेट दिली. यावेळी पोलिस स्टेशनचे कसे कामकाज चालते याबाबत संपूर्ण माहिती विद्यार्थांना देण्यात आली.

या वेळी भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक उतेकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रसेन पालकर, पोलिस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, गोपनीय विभागाचे विलास पाटील, स्वप्नील पाटील, नितीन राऊते तसेच सौ. सु. गी. पाटील विद्यालयाचे प्रशांत पाटील, दिलीप पाटील, एस.आर. झंवर, आर.डी. साळुंखे, मीनल पाटील, सुनंदा पाटील, मंजुषा पाटील आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.