जीपीएस परिवारातर्फे अनोख्या पद्धतीने बालिका दिवस साजरा

0

पाळधी, लोकशाही न्यूज नेटवर्क

स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील इंग्लिश मीडियम स्कूल पाळधी येथे अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले. शाळेतील इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी मानवी पाटील हिने सावित्रीबाई फुले यांचा वेश धारण केला होता आणि त्याच वर्गात शिकणाऱ्या फातिमा शेख या विद्यार्थिनीच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.

पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले व पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका फातिमा शेख या दोघांचा प्रतिबिंब जणू या दोघे विद्यार्थ्यांनी सर्वांसमोर मांडले. त्या विद्यार्थिनींच्या हस्ते प्रतिमा पूजन करत खऱ्या अर्थाने अनोखा बालिका दिवस जीपीएस परिवाराने साजरा केला. सावित्रीबाई फुलेंवर आपले मनोगत व्यक्त करणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना प्राचार्य सचिन पाटील यांच्या हस्ते बक्षीस रूपात शैक्षणिक साहित्य देऊन त्यांना प्रोत्साहित करण्यात आले. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धरी या शब्दात नारी शक्तीचा गौरव प्रस्तुत प्रसंगी करण्यात आला.

सदर कार्यक्रमाला संस्थेचे कार्याध्यक्ष प्रतापराव पाटील, विक्रम पाटील, भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य सचिन पाटील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी रुंद उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.