स्पर्धा परीक्षांमध्ये मेहनत घेतल्यास विदयार्थ्यांना यश मिळेल

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

तरुण, विदयार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेसाठी प्रयत्न करावेत. मेहनत घेतल्यास विदयार्थ्यांना यश मिळेल. पोलीस, आर्मी यासह राज्य व केंद्र सरकारच्या महसुलसह विविध क्षेञात नोकरी मिळवुन प्रगतीचे शिखर गाठा, असे विदयार्थ्यांना आवाहन करीत विदयार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस पञकार अशोकबापु परदेशी यांनी शुभेच्छाही दिल्या. ते गोंडगाव येथे आयोजीत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीरात मार्गदर्शन करतांना बोलत होते.

भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक उतेकर मार्गदर्शन करतांना म्हणाले की, विदयार्थ्यांनी जनरल नाॅलेजच्या पुस्तकांचे नित्याने वाचन करावे. मेहनत घ्यावी. तुम्हाला पोलीस, आर्मी, महसुल, राज्य उत्पादन शुल्क, युपीएससी, कक्ष अधिकारी यासह विविध क्षेञात चांगल्या नोकरीची संधी मिळु शकते. विदयार्थ्यांनी मनापासुन खरोखर मेहनत घेतली तर यश मिळेल. तरुणांसह तरुणींनाही सहजगत्या नोकरीची संधी मिळु शकते. मनात जिद्द ठेवा. तुम्हाला शंभर टक्के यश मिळेल, असे आवाहन व मार्गदर्शन भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांनी केले. ते गोंडगाव ता. भडगाव येथे जय हिंद करिअर अकॅडमी चाळीसगाव मार्फत आयोजीत एक दिवशीय मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीरात विदर्थ्यांना, तरुणांना मार्गदर्शन करतांना अध्यक्ष स्थानावरुन बोलत होते.

या भव्य मोफत स्पर्धा परीक्षा कार्यक्रमाचे आयोजन गोंडगाव येथील तरुण मंडळी, ग्रामस्थ मंडळीच्या अनमोल सहकार्यातुन भडगावचे पञकार अशोकबापु परदेशी मिञ परिवारातर्फे करण्यात आले होते. हा कार्यक्रम गोंडगाव येथील गांधी चौकात दि. २३ रोजी सायंकाळी ७.३० वाजता उत्साहात पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक उतेकर हे होते.

व्यासपिठावर भडगाव नगर परीषदेचे मुख्याधिकारी रविंद्र लांडे, भडगाव निवासी नायब तहसिलदार रमेश देवकर, नायब तहसिलदार राजेंद्र अहिरे, पञकार अशोक परदेशी, जेष्ठ नागरीक गंगाराम पाटील, जेष्ठ नागरीक नगराज पाटील, चाळीसगाव जय हिंद करिअर अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष मेजर पी. ए. पाटील, प्रा. भुषण जगताप, प्रा. योगेश सोनार, भडगाव तालुका वकील संघाचे माजी अध्यक्ष मुकुंद बी. पाटील, पञकार सतीष पाटील, शेतकरी संघटनेचे भडगाव तालुका अध्यक्ष विजय साळुंखे, जि. प. शाळा शिक्षण समितीचे अध्यक्ष व परीट समाजाचे अध्यक्ष ललीत मांडोळे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा प्रवक्ता व शिव व्याख्याते दत्तु मांडोळे, तांदुळवाडीचे उपशिक्षक प्रशांत पाटील, कोळगाव विदयालयाचे उपशिक्षक प्रशांत पाटील, प्रा. के. एन. चौधरी, पोलीस कर्मचारी स्वप्नील चव्हाण, नेहरु पवार, राजेंद्र कोतकर, सैनिक सुरेंद्र साळुंखे, सुभाष कोतकर, आण्णा पाटील, जगदिश मोरे, प्रशांत मोरे, जगदिश पाटील, समाजिक कार्यकर्ते व फोटोग्राफर मच्छिंद्र शार्दुल, भोला पाटील, वाडे येथील रोहन अशोक परदेशी आदि मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छञपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीचे पुजन करुन माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्तविकात भडगावचे पञकार अशोकबापु परदेशी यांनी केले. सुञसंचलन गोंडगाव जिल्हा परीषद शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ललीत मांडोळे तर आभार संभाजी ब्रिगेडचे जिल्हा प्रवक्ता व शिव व्याख्याते ललीत मांडोळे यांनी मानले.

भडगाव नगर परीषदेचे मुख्याधिकारी रविंद्र लांडे, चाळीसगाव जय हिंद करिअर अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष व मेजर पी. ए. पाटील, तांदुळवाडीचे उपशिक्षक प्रशांत पाटील, पञकार अशोक परदेशी, ललीत मांडोळे, दत्तु मांडोळे यांचेसह मान्यवरांनी विदयार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले. चाळीसगाव येथील जय हिंद अकॅडमीचे संचालक, मेजर पी. ए. पाटील यांनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगीतले कि, विदयार्थ्यांनी पोलीस, आर्मी, महसुल, स्टाॅफ सिलेक्शन यासह विविध स्पर्धा परीक्षा देतांना कोण कोणत्या पुस्तकांचा अभ्यास करावा? सामान्यज्ञान, बुद्धीमत्ता, गणित, व्याकरण अशा पुस्तकांच्या वापरावर भर दयावा. कोणता अर्ज भरावा? ग्राउंडचा सराव कसा करावा?, मन, चिकाटी, स्वतःची आत्मीयता, गृपने अभ्यास करावा, स्पर्धा परीक्षा पुस्तकांचा चांगला अभ्यास करावा, यश गाठण्यासाठी नक्कीच फायदा होईल. असे विदयार्थ्यांना मौलीक मार्गदर्शन केले. विदयार्थ्यांना प्रश्न विचारले. चर्चा घडवुन सविस्तर मार्गदर्शन मेजर पी. ए. पाटील यांनी केले.

त्यानंतर भडगाव नगर परीषदेचे मुख्याधिकारी रविंद्र लांडे यांनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगीतले कि, तुम्हाला जर करीअर घडवायचे असेल तर स्पर्धा पुस्तकांचा मन लावुन अभ्यास करा. कोणताही विषय निवडा. संधीचे सोने करा. नोकरीसाठी यशोशिखर गाठावे. असे आवाहनही भडगाव नगर परीषदेचे मुख्याधिकारी रविंद्र लांडे यांनी विदयार्थ्यांना केले. तसेच नुकतेच आर्मीत भरती निवड झालेले ललीत युवराज पवार, चेतन नेहरु पाटील, विशार रविंद्र पाटील, तसेच बी. एफ.एस. मध्ये भर्ती होऊन निवड झालेले सैनिकांचा तसेच कुस्त्या स्पर्धेत निवड झालेल्या सोनालीका समाधान पाटील, भुवनेश्वरी बाळु गायकवाड, अश्विनी भरत जाधव आदी विदयार्थीनींच्या निवडीबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच जगदिश पाटील, प्रशांत मोरे यांचाही सत्कार करण्यात आला.

गावातील श्री. इंटरनेट कॅफेचे संचालक जगदीश मोरे यांचे विदयार्थ्यांना पोलीस, सैन्य भरती आँनलाईन फाॅर्म भरण्यासाठी वेळोवेळी अनमोल सहकार्य लाभत असल्याबद्दल मान्यवरांचे हस्ते जगदीश मोरे यांचा देखील सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास जेष्ठ मंडळी, परीसरातील तरुण मंडळी, विदयार्थी, गावातील माऊली फाऊंडेशनच्या अभ्यासिका वर्गातील विदयार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीराचा लाभ घेतला. कार्यक्रम यशस्विततेसाठी गोंडगावातील जेष्ठ मंडळी, तरुण मंडळी, विदयार्थी, अशोकबापु परदेशी मिञ परीवार यांचे अनमोल सहकार्य लाभले. विदयार्थी, तरुणांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीराचा चांगला उपक्रम राबविल्याबद्दल गोंडगाव येथील तरुणांमार्फत पञकार अशोकबापु परदेशी यांचे पुष्पगुच्छ देउन सत्कार करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.