भडगाव येथे विकसित भारत संकल्प यात्रा रथाचा खा. उन्मेश पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

0

भडगाव– भारत सरकार फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहचविण्याच्या उद्देशाने केंद्र शासन मार्फत राज्य/केंद्र शासित प्रदेशांच्या सहकार्याने दि.15 नोव्हेंबर 2023 ते दि.26 जानेवारी 2024 या कालावधीत *विकसित भारत संकल्प यात्रा” ही मोहिम राबविण्यात येणार असून मोहिमेच्या जळगांव जिल्ह्यात फिरणाऱ्या रथापैकी आज भडगाव येथील रथाचा शुभारंभ करण्यात आला आहे.विविध योजनांच्या माध्यमातून एक तरी लाभ आपणास मिळावा यासाठी केंद्र सरकारची धडपड सुरू आहे.हा लाभातून आपण आत्मनिर्भर होणार असून यातून देश आणि देशवासी विकसित होणार असल्याचा मनोदय घेऊन ही संकल्प यात्रा आपल्या दारापर्यंत येणार असल्याचा आनंद असल्याची भावना खासदार उन्मेश पाटील यांनी व्यक्त केली आहे.

आज दुपारी दोन वाजता खासदार उन्मेश पाटील यांच्या हस्ते तर पाचोरा भडगाव विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे, भडगाव तालुका अध्यक्ष सोमनाथ दादा पाटील,शहर अध्यक्ष बन्सीलाल परदेशी, गटविकास अधिकारी रमेश वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.खासदार महोदयांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून जनजागृतीसाठी हा रथ रवाना करण्यात आला.

खासदार उन्मेश पाटील पुढे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात *भारत सरकार* च्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचावेत या दृष्टीने केंद्र शासनाने राज्य/केंद्र शासित प्रदेशांच्या सहकार्याने माहे एप्रिल-मे 2018 या कालावधीत ग्रामस्वराज्य अभियान तसेच माहे जुन-ऑगस्ट 2018 या कालावधीत विस्तारीत ग्राम स्वराज अभियान राबविले असून, अद्यापही ज्या योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेले नाहीत, अशा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या उददेशाने *”विकसित भारत संकल्प यात्रा”* ही देशव्यापी मोहीम केंद्र शासनाकडून आखण्यांत आली असून, आज *भडगाव* येथे भडगाव गटविकास अधिकारी रमेश वाघ यांच्या कार्यालयापासून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला असून ही एल ई डी माहितीपट असलेला रथ तालुक्यात फिरणार आहे. याप्रसंगी भडगाव तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील यांनी श्रीफळ वाढवून रथाचे पूजन केले. भाजपा पाचोरा भडगाव विधानसभा निवडणुक प्रमुख अमोलभाऊ शिंदे यांनी प्रास्ताविक तर शहराध्यक्ष बन्सीलाल परदेशी यांनी आभार मानले.यावेळी युवा मोर्चा शहराध्यक्ष विशाल चौधरी, सोशल मीडिया प्रमुख शुभम सुराणा, राहूल देशमुख, निखिल कासार, कुणाल पाटील यांच्या सह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.