लोकशाही न्यूज नेटवर्क
श्रद्धा वालकर प्रकरणाची पुन्हा एकदा पुनरावृत्ती झाली आहे. ओडिशामध्ये हि घटना घडली आहे. एका तरुणीच्या प्रियकराने तिची क्रूरपणे हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्याकेल्यावर नराधमाने तिच्या शरीराचे तब्बल ३१ तुकडे केले. या घटनेमुळे पुन्हा एकदा संपूर्ण देश हादरून गेला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
सविस्तर माहिती अशी की, हत्या झालेली तरुणी अवघ्या २२ वर्षांची होती. बुधवारी ती आपल्या आई-बाबांना सांगून घराबाहेर पडली. रात्र झाली तरी मुलगी घरी आली नाही म्हणून तिच्या कुटुंबीयांनी तिची शोधाशोध सुरु केली. मुलीचा काहीच तपास लागत नसल्याने शेवटी त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
बरंगपूर जिल्ह्यातील जंगलात शोधकार्यात तरुणीचा मृतदेह गवसला आहे. तिच्या मृतदेहाचे ३१ तुकडे करून जमिनीत पुरण्यात आले होते. पोलिसांनी हे सर्व तुकडे बाहेर काढले असून पुढील शवविच्छेदनासाठी पाठवलेत. तरुणीची हत्या नेमकी केव्हा झाली. तिला केव्हा जमिनीत पुरण्यात आलं, या सर्वांची माहिती रिपोर्ट समोर आल्यावरच समोर येईल.
पोलीस चौकशीत पुढे अस समोर आलं, तरुणीचे ज्या मुलावर प्रेम होते, त्याच्याशी तिला लग्न करायचे होते. आरोपीने सुरुवातीला तरुणीला आपल्या प्रमाचा जाळ्यात ओढले. नंतर तिने लग्नासाठी हट्ट केल्यावर तिला सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र तरुणीचा त्याला नकार होता.
लग्नाचा हट्ट घेऊन तरुणी थेट तरुणाच्या घरी पोहचली होती. घरी आल्यावर तिने पाहिले की तिच्या प्रियकराचे आधिच लग्न झाले होते. तसेच त्याला ५ मुलंही आहेत. मात्र तरीही तरुणीने त्याच्याशी लग्न करण्याचा हट्ट धरला. संतापात प्रियकर आणि त्याच्या पत्नीने तरुणीवर वार करत तिची हत्या केली. पोलिसांनी आता प्रियकर आणि त्याच्या पत्नीलाही ताब्यात घेतलंय.