भडगाव नगरपरिषदे तर्फे मान्सून पूर्व नालेसफाईला सुरुवात

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

भडगाव (Bhadgaon) नगरपरिषद तर्फे शहरात मान्सून पूर्व तयारी शहरातील नालेे, व गटारीच्या काठी, असलेले झाडेझुडपे मोठ्या प्रमाणात गटारींमध्ये साचलेला कचरा, काढून स्वच्छ करण्याचे काम भडगाव नगर परिषद तर्फे भडगाव नगरपरिषद मुख्याधिकारी रवींद्रर लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. भडगाव शहरातील आतापर्यंत शिवनेरी गेट ते ग्रामीण रुग्णालय मागील जुना पिंपळगाव रस्ता,सप्तशृंगी कॉलनी अक्सा नगर ग्रीन पार्क कॉलनी पर्यंत नालेसफाई करण्यात आली.टोणगाव ते आशीर्वाद कॉम्प्लेक्स, कोठली रस्ता आदर्श कन्याशाळा, जुना तरवाडे रोड बालविकास शाळे जवळ, कोल्ह्यानाला, ग्रामीण रुग्णालय जवळ, या ठिकाणे सह शहरातील विविध भागात मान्सूनपूर्वी भडगाव नगर परिषदेतर्फे जे.सी.बी द्वारा नाले साफ सफाई काम सुरू आहे याकामी स्वच्छता अभियंता गणेश लाड, स्वच्छता निरीक्षक तुषार नकवाल,आरोग्य लिपिक छोटु वैद्य,पाणीपुरवठा निरिक्षक विशाल महाजन,गोकुळ बोरसे इ. कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.