भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
माऊली फाऊंडेशन भडगाव यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्यांत गेल्या पाच वर्षापासुन रक्तदान शिबिर आयोजित केले जाते. रक्तदान श्रेष्ठ दान असुन रक्तदान केल्यामुळे अनेकांचे प्राण वाचु शकते. कोरोनामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झालेला आहे. याबाबतीत अधिक माहिती देतांना माऊली फाऊंडेशनचे स्वयंसेवक जाकिर कुरेशी यांनी सांगितले की, माऊली फाऊंडेशन दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करीत असते.
दरवर्षी रक्तदान शिबिरास भरभरुन प्रतिसाद मिळतो. सदर रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी माऊली फाऊंडेशनचे सर्व स्वयंसेवक संपुर्ण भडगाव शहर व तालुक्यात फिरुन रक्तदान करणाऱ्या इच्छुक असलेल्या नागरिकांचा अर्ज भरुन नोंदणी करुन घेतात. यावर्षी होणारे रक्तदान शिबिर आमच्या माऊली फाऊंडेशनसाठी महत्वपुर्ण आहे. कारण तीन वर्षांनी अमेरिकास्थित माऊली फाऊंडेशनचे अध्यक्ष मनोहर सुर्यवंशी हे भारतात येत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे रक्तदान शिबिर संपन्न होत असल्यामुळे माऊली फाऊंडेशनच्या सर्व स्वयंसेवकांमध्ये प्रचंड उत्साह दिसुन येत आहे.
म्हणुन यावर्षी होणारे रक्तदान शिबिर भव्य-दिव्य करण्याचा मानस जाकिर कुरेशी यांनी बोलुन दाखविला. तरी येत्या 30 जानेवारी रविवार रोजी निदान हाँस्पिटल, भवानी बागेसमोर, पारोळा रोड, भडगाव येथे सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असुन जास्तीत-जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे. असे आवाहन माऊली फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले. आज भडगाव येथे नोंदणी करण्यात आली. सदरप्रसंगी माऊली फाऊंडेशनचे सचिव देवेंद्र पाटील, दिलीप महाजन, एकनाथ महाजन आदी उपस्थित होते.