भडगाव तालुक्यात राष्ट्रवादीला खिंडार, युवक तालुकाध्यक्ष स्वप्नील पाटील यांचा पदाचा राजीनामा

0

भडगाव- सागर महाजन

विद्यार्थी दशेपासून विद्यार्थी कार्यकर्ता ,महाविद्यालय प्रमुख, विद्यार्थी संघटनेचा जिल्हाध्यक्ष, युवक तालुकाध्यक्ष अशी राष्ट्रवादी पक्षाची विविध पदांची धुरा सांभाळणारे भडगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष स्वप्नील पाटील यांनी आज पक्षांतर्गत कलहामुळे राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी पक्षाचे माजी आमदार दिलीप वाघ यांना दिलेल्या राजीनाम्यात त्यांनी म्हटले आहे की, विद्यार्थी दशेपासून मी विविध पदांवर काम करत आहेत. आपण मला नितांत प्रेम दिले विविध पद्धतीने आपला सदैव मी ऋणी राहील . आपण नेहमीच माझा राजकीय आलेख कसा उंचावेल यावर लक्ष दिले. या सर्व बाबींचा विचार करता मी सदैव आपला दृणी राहील. परंतु सामजिक व राजकीय जीवन जगताना अनेक अडचणी निर्माण होत असतात किंबहुना त्या निर्माण केल्या जातात. खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी म्हणून पुढे येण्यासाठी पक्षीय पदे यांच्या व्यतिरिक्त, निवडणूक लढविणे, विविध समित्यांवर नियुक्ती देणे, असे अनेक मुद्दे देखील महत्त्वाचे असतात . माझे दुर्दैव म्हणावे की काय परंतु अविरत पक्षनिष्ठा व आपल्या प्रतिनिष्ठा राखून देखील ज्या काळात आम्ही पक्षासाठी अनेकांशी विरोध पदरी घेतला, तीच मंडळीला आज आपल्या दरबारी स्थान मिळाले , पदे मिळाली . निधीमधील कामे मिळाली . वेळप्रसंगी पक्षासाठी घेतलेल्या विरोधामुळे आमच्यावर डाव रचून आम्हाला तुरुंगाची हवा खावी अशी सोय करण्यात आली. मनातून उद्विग्न झालेला व्यक्ती आपल्या पदाला न्याय देऊ शकत नाही. म्हणून मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. आपल्या राजकीय वाटचालीस शुभेच्छा. अशा शब्दात माजी आमदार दिलीप वाघ व राष्ट्रवादी युवक चे जिल्हा अध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या नावे स्वप्निल पाटील यांनी राजीनामा दिला आहे.
—–
स्वप्नील पाटील यांची ग्रामीण भागात युवकांची चांगली मोट बांधली आहे. सामान्य घरातून पुढे येत चांगले संघटन उभे केले आहे. राष्ट्रवादी पक्षात एकनिष्ठ व माजी आमदार दिलीप वाघ यांचे युवकानंमद्ये ते खंदे समर्थक होते. पक्षाअंतर्गत कलहा मुळे विद्यमान युवक तालुका अध्यक्ष चा राजीनाम्याने एकच चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादीला पडलेली ही खिंडार वेळीच भरुन काढण्याची प्रक्रिया पक्षाला करावी लागणार आहे. अजुनही काही लोकं अस्वस्थ असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे.
——–
आगामी नीवडणुकीसाठी युवकांवर मोठी मदार असल्याचित्र आहे. त्यामूळे राजीनामा देताच इतर पक्षानी पाटील यांच्याशी संपर्क सुरु केला असून भाजप किंवा शिंदे गट कडे जाण्याचा त्यांचा कल असू शकतो.

Leave A Reply

Your email address will not be published.