कालिचरण महाराज यांच्या विरुद्ध बारामतीत गुन्हा दाखल

0

लोकशाही, न्यूज नेटवर्क

 

कालिचरण महाराज सध्या वाद्ग्रस्त विधानांमुळे चर्चेत आहे. सतत काही नकाही वाद ते ओढून घेत आहे. शहरात 9 फेब्रुवारी रोजी आयोजित हिंदू गर्जना मोर्चात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी कालिचरण महाराज यांच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बारामतीत (Baramati) 9 फेब्रुवारी रोजी हिंदू गर्जना मोर्चा झाला होता. या मोर्चाची व्हिडिओ क्लिप पोलिसांनी बारकाईने पाहिली, या क्लिपमध्ये जातीय तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे वक्तव्य केल्याचे निदर्शनास आले. शहरातील तीन हत्ती चौकात मोर्चाचा समारोप झाला. तेथे कालिचरण महाराज (Kalicharan Maharaj) यांनी धार्मिक तेढ निर्माण होईल वादग्रस्त वक्तव्ये करत अफवा पसवण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत नमूद केला असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास एवढा उशीर का लावला याबद्दल शहरात चर्चा सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.