बँकेत तारण ठेवलेली जमीन परस्पर विकली; दोन जणांवर गुन्हा

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

बँकेमध्ये १२ लाखात तारण ठेवलेली जमीन परस्पर विक्री करून फसवल्याचा प्रकार समोर आलाय. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विठ्ठल काशिनाथ बावस्कर आणि त्यांची पत्नी सरला विठ्ठल बावस्कर दोन्ही रा. जामनेर जि.जळगाव यांची जळगाव शहरातील गट नंबर ४८७ असलेली २२५ चौरस मीटर जमीन ही २०१६ मध्ये १२ लाखासाठी इक्विटस फायनान्स बँकेत तारण ठेवले होते. त्यानंतर विठ्ठल बावस्कर व त्यांची पत्नी यांनी २०१९ ते २०२० दरम्यान गहाण ठेवलेली जागा ही परस्पर विकून टाकली.

सदर प्रकार इक्विटस फायनान्स बँकेच्या अधिकाऱ्यांना समजले असता त्यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन फसवणुकीची तक्रार दिली आहे. बँक व्यवस्थापक गणेश भालचंद्र शेडूते यांच्या फिर्यादीवरून विठ्ठल काशिनाथ बावस्कर आणि त्यांची पत्नी सरला विठ्ठल बावस्कर यांच्या विरोधात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर पवार करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.