Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नव्या आयुक्तांकडून अपेक्षा!
    • जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 
    • तुकाराम मुंढे यांचा धडाका : भेसळकरांना भरली धडकी!
    • अमृत योजनेच्या निकृष्ट कामाविरोधात मनपावर ‘घागर फोडो’ मोर्चा!
    • इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार
    • कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक
    • पाकिस्तानच्या जवानांचा थेट कामावर येण्यास नकार
    • युवासेना आयोजित जिल्हास्तरीय ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»लक्ष द्या.. एप्रिलमध्ये तब्बल 15 दिवस बँकांना सुटी; बघा संपूर्ण यादी
    महाराष्ट्र

    लक्ष द्या.. एप्रिलमध्ये तब्बल 15 दिवस बँकांना सुटी; बघा संपूर्ण यादी

    Tushar BhambareBy Tushar BhambareMarch 23, 2022Updated:March 23, 2022No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

    बँक संबंधित महत्वाची कामे असतील तर लवकर नियोजन करा. कारण एप्रिल महिन्यामध्ये बँका तब्बल 15 दिवस बंद राहणार आहेत.

    एप्रिल महिन्यात अचानक बँकेत जायच्या आधी सुट्ट्यांची ही यादी तपासून घ्या. जेणेकरून तुमचा वेळ आणि पैसा वाचेल. तसेच एक महत्त्वाचे म्हणजे एक एप्रिलपासून नव्या आर्थिक वर्षाला देखील सुरुवात होत आहे. नव्या आर्थिक वर्षात आर्थिक क्षेत्राशी संबंधित अनेक नियमांमध्ये बदल होत आहेत. जर तुम्ही तुमच्या पॅनला आधार कार्ड लिंक केले नसेल तर आजच लिंक करून घ्या. 31 मार्च ही पॅन आणि आधार लिंकिंगची डेडलाईन आहे. त्यानंतर तुम्हाला आर्थिक व्यवहारात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

    रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (RBI) वर्षाच्या सुरुवातीलाच देशभरातील बँकांना कोणत्या महिन्यात किती सुट्या आहे, याची एक यादी प्रसिद्ध केली जाते. या यादीनुसार या महिन्यात देशभरातील बँका तब्बल 15 दिवस बंद राहणार आहेत.

    सुट्यांचे नियोजन

    आरबीआयकडून देशभरातील बँकांच्या सुट्याची यादी महिन्यांच्या आधारावर वर्षाच्या सुरुवातीलाच प्रसिद्ध केली जाते. मात्र या यादीत अशा देखील काही सुट्या असतात. ज्या सुट्या फक्त त्या-त्या प्रदेशासाठीच मर्यादीत असतात. जसे की आठवड्याचा दुसरा आणि चौथ्या शनिवार आणि प्रत्येक रविवार या सुट्या देशातील प्रत्येक बँकेला असतात. परंतु अशा देखील काही सुट्या असतात की ज्या सुट्या त्या -त्या प्रदेशातील प्रसिद्ध व्यक्तीच्या जंयती पुण्यतिथीनिमित्त किंवा एखाद्या प्रसिद्ध उत्सावाच्या पार्श्वभूमीवर दिल्या जातात. अशा सुट्या या संपूर्ण देशात लागून होत नाहीत तर त्या प्रदेशापुरत्या मर्यादीत असतात.

    एप्रिल महिन्यातील सुट्यांची यादी

    01 एप्रिल – एक एप्रिलला वार्षिक क्लोजिंग दिवस म्हणून देखील ओळखले जाते. या दिवशी देशाभरातील जवळपास सर्वच बँका बंद राहतात.

    02 एप्रिल – दोन एप्रिलला शनिवार आहे. यंदाचा गुढीपाडवा दोन एप्रिल शनिवारी असल्यामुळे दोन एप्रिल रोजी बँका बंद राहातील.

    03 एप्रिल – तीन एप्रिलला रविवार असल्यामुळे रविवारी देशभरातील बँकांना साप्ताहिक सुटी असते, त्यामुळे बँका बंद राहातील.

    04 एप्रिल – चार एप्रिल सोमवारी सरहुलसाठी रांची आणि झारखंडमधील बँकांना सुटी आहे.

    05 एप्रिल – पाच एप्रिल रोजी बाबू जगजीवन राम यांची जंयती आहे. बाबू जगजीवन राम यांच्या जयंतीनिमित्त तेलंगना आणि हैदराबादमधील बँकाना सुटी आहे.

    09 एप्रिल – नऊ एप्रिल रोजी महिन्याचा दुसरा शनिवार असल्यामुळे बँका बंद राहणार आहेत.

    10 एप्रिल – दहा एप्रिल रोजी रविवार आहे, त्यामुळे बँका बंद राहातील.

    14 एप्रिल – चौदा एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्यामुळे बँकांना सुटी राहणार आहे.

    15 एप्रिल – पंधरा एप्रिल रोजी गुड फ्राइडे, बंगाली नववर्ष आणि हिमाचल दिवस असल्यामुळे बँकांना सुटी असणार आहे.

    17 एप्रिल – सतरा एप्रिल रोजी रविवार आहे. रविवारी बँकांना आठवडी सुटी असते त्यामुळे बँका बंद राहातील.

    21 एप्रिल – एकवीस एप्रिल रोजी गडिया पूजा नावाचा एक मोठ्या उत्सव अगरताळा आणि आसपासच्या प्रदेशात असतो त्यामुळे त्या दिवशी तिथे बँका बंद राहणार आहेत.

    23 एप्रिल – तेवीस एप्रिल रोजी आठवड्याचा चौथा शनिवार.

    24 एप्रिल–  रोजी रविवार.

    29  एप्रिलल-  शब ई कद्र, जुमात उल विदाच्या निमित्ताने बँक बंद राहणार आहेत.

    Bank Holidays in April New Delhi Reserve Bank of India
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 

    June 9, 2026

    अमृत योजनेच्या निकृष्ट कामाविरोधात मनपावर ‘घागर फोडो’ मोर्चा!

    June 9, 2026

    कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक

    June 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif