अंघोळ करतानाचा व्हिडीओ व्हायररल करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार

0

धरणगाव ;-तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या २६ वर्षीय विवाहितेला अंघोळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल करून पीडितेच्या मुलाला उचलून नेऊन व नवऱ्याला मारून टाकेल अशी धमकी देऊन जबरदस्तीने घरात घुसून अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून याबाबत एकाविरुद्ध धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी कि , ताल्लुक्यात एका गावात विवाहिता आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला असून आरोपी भूषण सुकलाल महाजन याने २६ वर्षीय विवाहितेचा बाथरूममध्ये अंघोळ करीत असतानाचा व्हिडीओ काढून तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच पीडितेच्या मुलाला उचलून नेऊन नवर्याला मारून टाकण्याची धमकी देत आरोपीने जून २०२३ ते १६ डिसेंबर २०२३ दरम्यान दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास जबरदस्तीने घरात घुसून तीन ते चार वेळा शारीरिक संबंध केले . याबाबत पीडित विवाहितेने आरोपी भूषण महाजन याच्याविरुद्ध ८ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास धरणगाव पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.