बागेश्वर बाबांचं पुन्हा वाद्ग्रस्त विधान, ब्युटी पार्लरमध्ये जाणाऱ्या महिलांवर साधला निशाणा

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

बागेश्वर बाबा हे आपल्या वाद्ग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. विधानांनी नेहमी चर्चेत राहतात. बागेश्वर बाबा देशात सध्या अनेक ठिकाणी प्रवचन करीत आहेत. बागेश्वर बाबा कधी हिंदू राष्ट्र निर्माण करण्याची चर्चा करीत आहेत. तर कधी गीतातील एका श्लोकांवरून वाद्ग्रस्त विधान ते करीत आहेत. सध्या एका वेगळाच व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये बागेश्वर बाबांनी महिलांच्या बाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. बागेश्वर बाबांचं ते विधान सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झाले आहे. त्याचबरोबर लोक बाबाची खरी-खोटी कहाणी सांगत आहे .

महिलांच्या रंगावर केली टिप्पणी
बागेश्वर बाबा (Bageshwar Baba) प्रत्येक महिलांच्या वर वादग्रस्त विधान करीत असतात. त्यांनी आता ब्युटी पार्लरमध्ये जाणाऱ्या महिलांबाबत एक विधान केलं आहे. त्यांनी ब्युटी पार्लरमध्ये जाणाऱ्या महिलांना काळं जाभूळं म्हटलं आहे. एका व्हिडिओमध्ये त्यांनी महिलांवर टीका केली आहे. आणि हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामुळे बागेश्वरबाबांवर टीकेची झोड उठली आहे. काही लोकांनी कमेंटच्या माध्यमातून बाबांचा चांगलाच समाचार घेतला आहे. हे पहिल्यांदाच नाही तर असे अनेकवेळा त्यांनी महिलांवर टीका केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.