जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२३ संपन्न

0

 

जळगाव ;- जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन व जैन स्पोर्ट्स ॲकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड जळगाव प्रायोजित जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२३ यशस्वीरित्या पार पडल्या. या स्पर्धा दिनांक ०९ जुन ते ११ जुन २०२३ दरम्यान जळगाव जिल्हा क्रीडा संघाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये घेण्यात आल्या. या स्पर्धांमध्ये अनुक्रमे ११, १३, १५, १७, १९, वर्षे वयोगटातील मुले व मुली एकेरी व १५, १७, १९ मुले व मुली दुहेरी व मिश्र दुहेरी, तसेच पुरुष आणि महिला खुला गट व ३५+ वर्षांवरील पुरुष आणि महिला एकेरी, दुहेरी व मिश्र दुहेरी या सर्व गटांचा समावेश होता.

या स्पर्धेमध्ये जळगाव, चाळीसगाव, भुसावळ, जामनेर, एरंडोल, पाचोरा, भडगाव, वरणगाव व चोपडा या तालुक्यांमधून १९० खेळाडूंचा सहभाग नोंदविला होता.

स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जैन स्पोर्टस अकॅडमी चा राष्ट्रीय खेळाडू शुभम पाटील व जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव विनीत जोशी, सदस्य शेखर जाखेटे तसेच जैन स्पोर्ट्स अकॅडमी चे क्रीडा समन्वयक रवींद्र धर्माधिकारी व मुख्य पंच श्रीमती चेतना शाह व डॉ. अमित राजपूत उपस्थित होते.

याप्रसंगी पुणे येथे नुकत्याच झालेल्या सिनियर नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये जैन स्पोर्ट्स अकॅडमी चा खेळाडू शुभम पाटील याने उत्कृष्ट कामगिरी करून यशस्वी सहभाग नोंदविला, तसेच साऊथ कोरिया येथे होणार असलेल्या वर्ल्ड मास्टर्स चॅम्पियनशिप मध्ये श्रीमती वृषाली पाटील यांची निवड झाल्याबद्दल बॅडमिंटन साहित्य देऊन या दोघांचा संघटनेच्या वतीने सचिव श्री विनीत जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या स्पर्धेचे विजयी व उपविजयी खेळाडू पुढीलप्रमाणे आहे

११ वर्षा आतील मुले एकेरी

विजयी – विहान राहुल बागड

उपविजयी – आरव अमित दुडवे

११ वर्षा आतील मुली एकेरी

विजयी – ओवी अमोल पाटील उपविजयी – ओवी पुरुषोत्तम बोरनारे

१३ वर्षा आतील मुले एकेरी

विजयी – शांतनु शैलेश फालक

उपविजयी – सक्षम ब्रिजलाल तुलसी

१३ वर्षा आतील मुली एकेरी

विजयी – ओवी अमोल पाटील

१५ वर्षा आतील मुले एकेरी

विजयी – पियुष योगेश खडे

उपविजयी – अन्वेष सुधीर नारखेडे

१५ वर्षा आतील मुली एकेरी

विजयी – पूर्वा किशोर पाटील उपविजयी – तनिषा अनिल साळुंखे

१५ वर्षा आतील मुले दुहेरी

विजयी – अंकित हरिश्चंद्र कोळी आणि अन्वेष सुधीर नारखेडे

उपविजयी – वीर किशोर भोसले आणि अर्जुन सत्यजित पूर्णपात्रे

१७ वर्षा आतील मुले एकेरी

विजयी – शुभम जितेंद्र चांदसरकर

उपविजयी – दक्ष धनंजय चव्हाण

१७ वर्षा आतील मुली एकेरी

विजयी – इशिका कपिल शर्मा उपविजयी – ओवी अमोल पाटील

१९ वर्षा आतील मुले एकेरी

विजयी – तेजम केशव

उपविजयी – शुभम जितेंद्र चांदसरकर

१९ वर्षा आतील मुली एकेरी

विजयी – गीता अखिलेश पंडित उपविजयी – इशिका कपिल शर्मा

१९ वर्षा आतील मुले दुहेरी

विजयी – जाजीब सुहेल शेख आणि अर्श रहीम शेख

उपविजयी – रौनक नितीन चांडक आणि तेजम केशव

पुरुष एकेरी

विजयी – कौशिक प्रवीण बागड

उपविजयी – सौरभ शिवचंद बर्वे

महिला एकेरी

विजयी – गीता अखिलेश पंडित

उपविजयी – इशिका कपिल शर्मा

पुरुष दुहेरी

विजयी – कौशिक प्रवीण बागड आणि मयूर राजेंद्र भावसार

उपविजयी – अर्श रहीम शेख आणि जाजीब सुहेल शेख

३५ वर्षावरील पुरुष एकेरी

विजयी – विनायक बालदी

उपविजयी – अमित दुडवे

३५ वर्षावरील पुरुष दुहेरी

विजयी – डॉ. तुषार गणेश उपाध्ये आणि तनुज शर्मा

उपविजयी – समीर सुनील रोकडे आणि अमित दुडवे

३५ वर्षावरील मिश्र दुहेरी

विजयी – डॉ. तुषार गणेश उपाध्ये आणि डॉ. वृषाली वरून सरोदे

उपविजयी – डॉ. अमित राजपूत आणि प्रज्ञा अमित राजपूत

या स्पर्धांमध्ये मुख्य पंच म्हणून श्रीमती चेतना शाह व पंच म्हणून देवेंद्र कोळी, योमेश टोंगले, भूषण पाटील, दर्शन गवळी यांनी काम पाहिले. तसेच स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमी चे प्रशिक्षक किशोर सिंह सिसोदिया यांच्या मार्गदर्शना अंतर्गत आयशा खान, सोमदत्त तिवारी, अक्षय हुंडीवाले, जाजीब शेख, अतुल ठाकूर, करण पाटील, देव वेद, रौनक चांडक, पुनम ठाकूर, सुमिती ठाकूर, शुभम चांदसरकर, कृष्णा केशव, तेजम केशव, राखी ठाकूर, दीपिका ठाकूर, हमजा खान, आर्य गोला, ओम अमृतकर यांनी मेहनत घेतली. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जैन स्पोर्टस अकॅडमी ची खेळाडू गीता पंडित व आभार प्रदर्शन प्रशिक्षक किशोर सिंह सिसोदिया यांनी केले.

या स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंचे व विजेता खेळाडूंचे अभिनंदन जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन आणि जैन स्पोर्ट्स अकॅडमी चे क्रीडा समन्वयक अरविंद देशपांडे यांनी केले व पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.