आमच्याही अंगात भगतसिंग येतील ; बच्चू कडू आक्रमक

0

 

अमरावती, लोकशाही न्यूज नेटवर्क:

राणा पाना फुटाण्यासारखे फोडू, एका गालावर आम्हाला मारल्यावर आम्ही सहन करणार का? आमच्या अंगात मग भगतसिंह येतील, हम उडा बी सकते है सालो को.. असा इशाराच माजी मंत्री आणि आमदार बच्चू कडू यांनी दिला. अमरावतीत एका कार्यक्र्मात ते बोलत होते.

बच्चू कडू म्हणाले, बाबासाहेब आंबेडकरांचे काँग्रेसशी कधीच पटले नाही, परंतु जेव्हा जुळले तेव्हा त्यांनी तत्त्व सोडले नाहीत. शिवाजी महाराज मुळ तत्त्वापासून कधीही दुर गेले नाही. आमचे तत्त्व मुळ सामान्य माणूस कोणत्याही समाजाचा असो. सामान्य माणसांच्या हिताला आमच्या राजकारणामुळे जर बाधा आली तर सत्ता आणि राजकारण दुर पण कार्यकर्ता म्हणून मी लढायला तयार राहील. आम्ही अधिक ताकदीने लढू शकतो. सामान्य माणूसचा आमचे मुळ आहे. तो आमच्यासाठी देवासमान आहे. त्याची अडचण आमची अडचण आहे, असे कडू म्हणाले.

बच्चू कडू म्हणाले, मंदिर पडले तरी एवढे दुखः होणार नाही, पण सामान्य माणूस जर कुठे थांबला तर आम्हाला जास्त त्रास होतो. सामान्य माणूस आमचार आचार आणि विचार आहे. सामान्य माणसाला ईजा होता कामा नये. सामान्यांना पुढे घेऊन जावे लागेल.

बच्चू कडू म्हणाले, याचा अर्थ कुणी आमच्या एका गालावर कुणी मारावे आणि आम्ही सहन करावे तर आमच्याही अंगात भगतसिंह येते हे विसरु नका. हम उडा भी सकते है सालो को. आम्ही भगतसिंहाचा विचार पुढे घेऊन जात आहोत. जे विचार आम्हाला पुरक आहेत. जे विचार राष्ट्राला पुढे नेतील त्याचा अंगीकार आपण करीत आहोत.

बच्चू कडू म्हणाले, माझ्या मनात जेव्हा कपट येईल तेव्हा मी राहणार नाही, पण माझे नाव बच्चू असले तरी आम्ही छोटे नाही. आम्ही आरपार लढू शकतो. राणा आणि माझ्यात मुख्यमंत्री मध्यस्ती करणार आहेत, पण मला राणांसोबत बसण्याची ईच्छा नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.