आ. किशोरआप्पा पाटलांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

भडगाव- पाचोरा विधानसभा मतदार संघाचे लाडके व लोकप्रिय कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांचा दि.1 नोहेंबर रोजी वाढदिवस आहे. त्या वाढदिवसाचे औचित्य साधून दि. 30 रोजी तालुक्यातील बात्सर येथे भव्य मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे आयोजक युवानेते राकेश संजय (भुरा आप्पा) पाटील यांनी केले होते. या स्पर्धेत अनेक तरुणांनी सहभाग घेतला. या वेळी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख संजय श्रावण पाटील (भुरा आप्पा),डॉ. प्रमोद पाटील, पि.ए पाटील विनोद पाटील, रघुनाथ पाटील, उत्तमराव पाटील,प्रभाकर पाटील यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतलेल्या तरुणांना आकर्षित बक्षीस वितरण करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.