आविष्कार संशोधन स्पर्धा च्या प्रथम फेरीचे उद्या आयोजन

0

जळगाव ;- आविष्कार संशोधन स्पर्धा २०२३-२४ मधून प्रथम फेरीचे आयोजन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात शुक्रवार दि. २० आक्टोबर रोजी करण्यात आले आहे.

आविष्कार स्पर्धेचे उदघाटन प्र. कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांच्या हस्ते होणार असून राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य श्री. राजेंद्र नन्नवरे आणि कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या स्पर्धेसाठी निरीक्षक म्हणून प्रा. पी. पी. माहुलीकर हे उपस्थित असतील. ही स्पर्धा विद्यापीठाच्या पदवीप्रदान सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.

आविष्कार स्पर्धेकरिता एकुण सहागट असून गट निहाय सहभागीची संख्या पुढील प्रमाणे आहे. गट पहिला: मानव्यविदया भाषा व ललित कला ७३ स्पर्धक , गट दुसरा : वाणिज्य व्यवस्थापनशास्त्र आणि विधी १६ स्पर्धक, गट तिसरा : विज्ञान -भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जैवशास्त्र, गणित, पर्यावरणशास्त्र गह आणि संगणकशास्त्र ११० स्पर्धक, गट चौथा : कृषी आणि पशुसंवर्धन २४ स्पर्धक, गट पाचवा : अभियांत्रिकी व तंत्रज्ञान ७० स्पर्धक, गट सहावा : औषधनिर्माणशास्त्र १७ स्पर्धकांनी भाग घेतलेला आहे.

विदयापीठ परीसरातील आविष्कार स्पर्धेकरिता पदवीचे विद्यार्थी, पदव्युत्तर विद्यार्थी आणि संशोधक विद्यार्थी तसेच मा. कुलगुरू संशोधन प्रोत्साहन योजनेतेर्गंत संशोधन अनुदानप्राप्त (VCRMS) ८४ शिक्षक सहभागी होणार आहेत. कुलगुरू संशोधन प्रोत्साहन योजने अंतर्गंत सहभागी शिक्षकांच्या पेास्टर्सचे मूल्यांकन होउन प्रत्येक कॅटेगरी मध्ये प्रथम व व्दित्तीय क्रमांक प्रदान करण्यात येणार असून त्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

विदयापीठ परीसरातील आविष्कार स्पर्धेकरिता डॉ. व्ही. एम. रोकडे हे समन्वयक म्हणून तर डॉ. संतोष खिराडे हे उपसमन्वयक म्हणून कार्य पाहत आहेत. तसेच या संपूर्ण स्पर्धेचे समन्वयक प्रा. जयदीप साळी व उपसमन्वयक प्रा. जितेंद्र नारखेडे हे आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.