Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पाचोरा तालुक्यात वाळू माफियांचे धाबे दणाणले
    • मंत्र्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही : खडसे आक्रमक
    • उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या खाजगी विमानात बिघाड
    • जिल्ह्यात १० वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून
    • अल्पवयीन तरुणांकडून चक्क जिम मालकावर गोळीबार
    • ‘धुरंधर’मुळे यश मिळालं, तेव्हा त्यांनी आवाज उठवला
    • ते सर्व फक्त सत्तेचे दलाल, सत्तेचे लालची, नमक हराम..!
    • नव्या आयुक्तांकडून अपेक्षा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»वनोली साईबाबा मंदिरात रविवारी महाप्रसादाचा कार्यक्रम
    जळगाव जिल्हा

    वनोली साईबाबा मंदिरात रविवारी महाप्रसादाचा कार्यक्रम

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 19, 2023Updated:October 19, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क

    तालुक्यातील तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळालेल्या श्री साईबाबा देवस्थान वनोली तालुका यावल, या मंदिरात सालाबादप्रमाणे नवरात्र उत्सवाची पूर्ण तयारी झालेली असून घटस्थापने नंतर अश्विन शुद्ध अष्टमी ही यावर्षी रविवार दिनांक 22 ऑक्टोबर 23 रोजी येत असून त्या दिवशी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला असून, या कार्यक्रमाला राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार गिरीश भाऊ महाजन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील खासदार रक्षा खडसे हे विशेष उपस्थित राहणार असल्याचे या मंदिराचे विश्वस्त तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती हिरालाल भाऊ व्यंकट चौधरी यांनी केले आहे.

    वनोली हे गाव भुसावळ फैजपूर रस्त्यावरील पाडळसे बामणोद गावापासून तीन किलोमीटर अंतरावर मध्ये आहे. या ठिकाणी शंभू महादेवाची पिंडीची स्थापना व दोन नंदादीप श्री साईबाबांच्या हस्ते लावण्यात आलेले होते. ते आजही तेवत आहेत. एकीकडे दुष्काळ पडला त्यावेळी मंदिरात दिव्यांमध्ये तेल नव्हते. साईबाबा महाराजांनी उघड्या डोळ्यांनी हे पाहिले त्यावेळी अक्षरशः साईबाबांनी दिव्यांमध्ये पाणी टाकून दिवा लावलेला दिसला. असे गावकरी सांगतात 564 वर्षापासून आजही हे नंदादीप जळतांना दिसतात. या मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी आजपर्यंत युती शासन असताना तत्कालीन आमदार सुरेश दादा जैन व आमदार एकनाथ खडसे यांच्या माध्यमातून मोठा निधी मिळाला होता. त्यानंतर खऱ्या अर्थाने या परिसराचा विकास होण्यामागे स्वर्गीय कृषी मित्र माजी आमदार तथा खासदार हरिभाऊ जावळे यांचे खरं प्रयत्न आहे. त्यासोबतच जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे, स्वर्गीय खासदार वाय जी महाजन, खासदार रक्षाताई खडसे, आमदार शिरीष चौधरी यांनीही या मंदिराच्या जडणघडणीसाठी हातभार लावला आहे.

    दरवर्षी नवरात्र उत्सव हा पावसाळ्यात येत असतो मात्र यावर्षी अधिक श्रावण महिन्यामुळे एक महिना दसरा उशिराने आला. त्यामुळे यावर्षी मोठ्या प्रमाणावर श्री साईबाबा महाराजांची महाप्रसादासाठी जळगाव जिल्हा भरातूनच नव्हे तर, गुजरात मध्य प्रदेश राज्यातूनही लोक या ठिकाणी महाप्रसादाला येतात व येतील असा अंदाज विश्वस्तांनी व्यक्त केला आहे.

    22 ऑक्टोबर रविवार रोजी संध्याकाळी 40 ते 50 हजार भाविक महाप्रसादाला भेट देतील असा अंदाज आहे. या महाप्रसादांमध्ये उडदाच्या डाळीचे वडे, खीर, गंगा फळची भाजी, आणि पोळ्या या सर्वांसाठी साईबाबाच्या प्रांगणातच तयार केल्या जातात. रात्री उशिरापर्यंत या महाप्रसादाची सांगता होते. या कार्यक्रमाला यावल रावेर तालुक्याचे प्रांत अधिकारी तालुक्याचे तहसीलदार प्रशासकीय अधिकारी तलाठी ग्रामसेवक फैजपूर पोलीस स्टेशनचे संपूर्ण स्टाफ आरोग्य विभागाचे स्टाफ वीज मंडळाचे अधिकारी हे आपापले कामगिरी बजावतात.

    महाप्रसादानंतर दुसऱ्या दिवशी दिनांक 23 ऑक्टोबर सोमवार रोजी सकाळी साईबाबा मंदिराची यात्रा असते शंभर फूट उंच देवकाठी ही मोर नदीवर नेऊन धुतली जाते व तिथून तिला सजवून वाजत गाजत वाजंत्री च्या साह्याने गावात आणून मंदिरापर्यंत पोहोचवली जाते. संध्याकाळी बारा गाड्या असतात व बारा गाड्या नंतर काही दोन लोकनाट्य ग्रामस्थांच्या करमणुकीसाठी ठेवले जातात.

    श्रीक्षेत्र वनोली साईबाबा मंदिराच्या महाप्रसादासाठी जळगाव जिल्हा भरातून भाविकांनी मोठ्या संख्येने शिस्तीने व शांततेने हजेरी लावावी व मंदिर प्रशासनाला सहकार्य करावे. असे आवाहन श्री साईबाबा मंदिर ट्रस्ट विश्वस्त तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती हिरालाल भाऊ चौधरीसह वनोली साईबाबा मंदिर चे भगत आत्माराम सपकाळे ग्रामस्थ आणि सरपंच उपसरपंच विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व संचालक मंडळ आणि वनोली ग्रामस्थांनी आवाहन केले आहे.

    Vanoli
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    पाचोरा तालुक्यात वाळू माफियांचे धाबे दणाणले

    June 11, 2026

    जिल्ह्यात १० वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून

    June 11, 2026

    कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक

    June 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif