अल्पवयीन मुलीस पळवून लग्न लावून केले गर्भवती

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
शहरात एका परिसरात राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून तिच्याशी लावून गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील एका भागात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आई वडीलांसह राहत असून मुलगी ही अल्पवयीन आहे असे माहिती असतांना जळगाव तालुक्यातील एका गावात राहणारा तरूणाने तिला २५ जुलै २०२२ रोजी दुचाकीवर बसवून पळवून नेले. तरूणाने त्याच्या बहिणीकडे नेवून तिच्यासोबत लग्न केले. या लग्नाला पिडीत मुलीच्या आईचा विरोध होता. याचा राग मनात ठेवून पिडीत मुलीला मारहाण करून शारिरीक व मानसिक छळ केला.

तसेच तिच्यावर जबरी अत्याचार करून तिला गर्भवती केले. हा प्रकार सहन न झाल्याने पिडीत मुलगी ही माहेरी निघून आली. माहेरच्या मंडळींना सोबत घेत पिडीत मुलीने एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून याबाबत तक्रार दिली. पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून पती, सासू, सासरे, नंनद, नंदोई यांच्याविरोधात गुरूवार २३ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिस शेख करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.