लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर विविध ठिकाणी लॉजवर नेऊन अत्याचार

0

गर्भधारणा झाल्यावर गोळ्या खाऊ घालून केला गर्भपात;आरोपीला अटक

फैजपूर:- गेल्या अनेक महिन्यापासून वेळोवेळी पीडितेच्या असहायतेचा फायदा घेऊन तिच्यावर फैजपूर ,जळगाव,भुसावळ अशा विविध ठिकाणी नेऊन लॉजवर अत्याचार करून तिला गर्भधारणा झाल्यावर गोळ्या खाऊ घालून तिचा गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की पीडित महिलेला आरोपी रामचंद्र वाघोदे राहणार वडगाव तालुका रावेर याने 2017 ते 2018 आज पर्यंत वेळोवेळी लग्नाचे आमिष दाखविले व तिच्यावर फैजपूर,भुसावळ, जळगाव अशा अनेक ठिकाणी लॉजवर अत्याचार केल्याचा प्रकार घडला असून यात याने पीडीतेशी सुरुवातीला प्रेम संबंध स्थापित करून नंतर तिच्याशी शारीरिक संबंध ठेवून तिला लग्नाचे आमिष देऊन तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. यात पीडित महिलेला गर्भधारणा झाल्यानंतर तिला आयुर्वेदिक गोळ्या खाऊ घालून तिचा गर्भपात केल्याचाही प्रकार आरोपीने केला. मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित महिलेने फैजपूर पोलीस स्टेशनला रात्री फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक केली असून त्याच्याविरुद्ध फेसबुक पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोलीस उपनिरीक्षक एमजे शेख करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.