महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणी पहिल्या आरोपीस अटक

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणात मुंबई क्राइम ब्रांचला मोठं यश मिळालं आहे. या प्रकरणात क्राइम ब्रांचने पहिल्या आरोपीस अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ वर्षीय कोठारील याला अटक करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मागील वर्षी माटुंगा पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली होती. त्यानंतर क्राइम ब्रांचकडे हस्तांतरित करण्यात आले होते. त्यानंतर एसआयटी स्थापना करण्यात आली होती.

महादेव बेटिंग अ‍ॅपच्या माध्यमातून १५ हजार कोटी रुपयांचा घोळ झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी मुख्य आरोपी सौरभ चंद्राकर हा दुबईत असून, त्याला नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. चंद्राकर हा याप्रकरणात मास्टर माईंड असल्याचं सांगण्यात येतंय. याच प्रकरणी प्रवर्तक रवी उप्पल याला दुबईत अटक करण्यात आली आहे. सक्तवसुली संचालनालय याप्रकरणात तपास करत आहे.

मनी लाँड्रिंग कायद्याअंतर्गत ईडी या प्रकरणाचा तपास करत आहे. प्रवर्तक रवी उप्पल याविरोधात ईडीने रेट नोटीस जरी केली होती. त्यानंतर दुबईतील पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. रवी उप्पल आणि सौरभ चंद्राकर या दोघांना भारत सरकारकडे हस्तांतरित करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे.छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे देखील नाव घेण्यात आले होते. त्याचा फटका त्यांना निवडणुकीत बसल्याचं बोललं जातं.

दरम्यान, सौरभ चंद्राकरयाने दुबईमध्ये भव्य लग्न आयोजित केले होते. यामध्ये तब्बल २०० कोटी रोख रकमेचा वापर करण्यात आल्याचं समोर आलं आहे. त्याने अनेक बड्या कलाकारांना लग्नाचे आमंत्रण दिले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.