अवैध वाळू वाहतुक करणाऱ्या डंपरचा भिषण अपघात

0

यावल ;- यावल फैजपुर रोडवर सकाळच्या सुसाट वेगाने धावणाऱ्या अवैद्य गौण खनिजची अवैद्य वाहतुक करणाऱ्या डंपरचा भिषण अपघात झाल्याची माहीती प्राप्त झाली असुन हा अपघात ईतका भिषण आहे की यात डंपरची दोन तुकडे झाली असुन, मात्र या अपघातात जिवीतहानी झाली नसल्याचे वृत्त मिळाले आहे . यावल तालुक्यात मोठया प्रमाणावर रात्रीच्या वेळीस भरधाव वेगाने धावणाऱ्या डंपराव्दारे किंवा ट्रॅक्टर व्दारे अवैद्य वाळुची वाहतुक करण्यात येत असुन, या अवैद्य गौणखनिज माफीयाशी काही प्रशासकीय मंडळीचा सहभाग असल्याची चर्चा मागील काही दिवसापासुन परिसरात दबक्या सुरात होत असुन यात खरे काय आहे याचा शोध वरिष्ठ पातळीवर घेण्यात यावा .

या विषयाला महसुल प्रशासनाच्या वारिष्ठांनी गांर्भीयाने घेणे अत्यंत गरजे असल्याचे बोलले जात आहे.

यावल फैजपुर मार्गावरील ढाके वकील यांच्या शेताजवळच्या पुढील वळणावर आज दिनांक ३१ मार्च रविवार रोजी सकाळी ३ते ४ वाजेच्या सुमारास यावल ते चितोडा रस्त्या दरम्यान वाळुची वाहतुक करणाऱ्या एका चार चाकी डंपरचा भिषण अपघात झाल्याची माहिती मिळाली असुन ,या अपघातात डंपरचा वेग ईतका होता की यात डंपरचे दोन तुकडे झाले आहे अपघात झाल्यानंतर डंपर चालकाने घटनास्थळा वरून फरार झाला आहे.

या मार्गावरील सकाळच्या सुमारास मोठया संख्येत अनेक नागरीक महिला पुरुष हे वॉकिंग करण्यासाठी जात असतात सुदैवाने अपघात ठीकाणी कुणी ही वॉकिंगला जाणारे पादचारी मिळून आले नाही अन्यथा या अपघातात मोठी जिवितहानी झाली असती,तरी महसुलच्या वरिष्ठांनी या संदर्भात दक्षता घेत अशा प्रकारे होणाऱ्या अवैद्य गौण खनिजची वाहतुकीस पायबंद करावे अशी मागणी होत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.