एसटी बसची दुचाकीला धडक ; एक जण ठार

0

जळगाव ;- बांभोरी कडून द्वारका नगरकडे जाणाऱ्या दुचाकीला एसटी बसने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास बांभोरी जवळील महामार्गावरील हॉटेल साई पॅलेस जवळ घडली. याप्रकरणी एसटी बस चालकाविरुद्ध जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महेश कुमार सुरेश पाटील राहणार स्वामी समर्थ कॉलनी द्वारका नगर जळगाव ता. जि. जळगाव असे मयताचे नाव आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, स्वामी समर्थ कॉलनी येथे राहणारे महेश कुमार पाटील हे त्यांची दुचाकी क्रमांक एम एच १९ डि.जे.१४०५ ने बांभोरी येथून घराकडे जात असताना एसटी बस क्रमांक एम एच 40- एन ९८३८ ने सायंकाळी चार वाजेच्या सुमारास धडक दिली.

या धडकेत महेश कुमार पाटील हे रोडावर खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला व तोंडाला गंभीर दुखापत होऊन ते जागीच ठार झाल्याची घटना घडली. या प्रकरणी गणेश दिलीप पाटील वय 39 रा. स्वामी समर्थ कॉलनी यांच्या फिर्यादीवरून बस चालक आयुब शेख चांद पिंजारी रा. एरंडोल यांच्याविरुद्ध जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे . तपास पोहेकॉ भगवान महाजन करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.