विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्ती प्रकरणावर उद्या निर्णय

0

मुंबई ;- विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्ती प्रकरणावर उद्या 12 मे रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीसाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे यादी दिली होती, मात्र त्यांनी त्यावर निर्णय घेतला नव्हता. त्यामुळे सदरचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आहे.

महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल नियुक्त 12 विधान परिषद सदस्यांच्या नियुक्तीबाबत तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता, मात्र कोश्यारी यांनी याबाबत कोणतीच कारवाई केली नाही. पुढे राज्यात सत्ताबदल झाल्यावर मविआ सरकारने पाठविलेला प्रस्ताव कोश्यारी यांनी कोणतेही स्पष्टीकरण न देता 5 सप्टेंबर 2022 ला सरकारकडे परत पाठवला. यानंतर मिंधे सरकारने आपल्या मर्जीतील सदस्यांच्या नियुक्तीसाठी हालचाली सुरू केल्या होत्या. त्यामुळे सदरचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते. दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कोल्हापूर शहरप्रमुख सुनील मोदी यांनी इंटरवॅशन अर्ज दाखल करत मुख्य पिटीशनर होण्याची तयार दर्शवत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने दिलेली मूळ यादी दिली तीच कायम ठेवावी, अशी मागणी केली होती. तसेच राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार काम करायला हवे. राज्यपालांनी घटनेची पायमल्ली केली आहे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य याचिकाकर्त्याने माघार घेतल्याने सर्वोच्च न्यायालयाने सुशील मोदी यांना मुख्य याचिकाकर्ता म्हणून मंजुरी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.