Friday, August 12, 2022

अमळनेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार एंट्री

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

अमळनेर तालुक्यात काल संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणावर उकाडा जाणवत होता. या उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.

काल संध्याकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. तसेच विजेच्या तारा व खांबाना नुकसान झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. धानोरा फाट्याजवळ रस्त्यालगतचे झाड रस्त्यावर पडल्याने वाहतूक काही काळ बंद झाली होती.

तसेच तालुक्यातील बोरीकाठावर पावसाचा तडाखा मोठ्या प्रमाणावर बसला. अंतूर्ली रंजाने परिसरात काही काळ गारपीट झाली. तसेच अंतूर्ली शिवारात काही शेतामध्ये पाणी साचून नाले वाहून निघाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या