अमळनेरच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रवींद्र शोभणे यांची निवड

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे होणार आहे. साने गुरुजी यांच्या कर्मभूमीत होणाऱ्या या संमेलनासाठी अध्यक्षांची निवड जाहीर झाली आहे. अध्यक्षपदी रवींद्र शोभणे यांची निवड झाली आहे. पुणे येथे रविवारी झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत रवींद्र शोभणे यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे, जेष्ठ कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे, जेष्ठ बाल साहित्यिक न. म. जोशी यांची नावेही अध्यक्षपदासाठी चर्चेत होती. परंतु शोभणे यांचे नाव बहुमताने निवडण्यात आले. बैठकीत संमेलनाच्या तारखांवरही विचार करण्यात आला. डिसेंबर महिन्याच्या शेवटी किंवा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संमेलनाचे आयोजन होण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.