प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांचा जळगाव जिल्हा दौरा

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

25 जून रविवार 2023 रोजी वसंत स्मृती भाजपा कार्यलय येथे सकाळी 10:00 वाजता प्रदेशाध्यक्ष राहुलभैया लोणीकर यांची जिल्हा दौरा निमित्त पत्रकार परिषद झाली असुन, वसंत स्मृती येथे आयोजित करण्यात आली. पत्रकांराशी युवा मोर्चा प्रदेशध्यक्ष राहुलभैया यांनी संवाद साधत मोदी सरकार चे यशस्वी ९ वर्षपूर्ती बद्दल माहिती दिली. तसेच भा.ज.यु.मो. प्रदेश पदाधिकारी यांच्या दौऱ्या निमित्ताने भव्य बाईक रॅली काढून कार्यक्रमाची सुरुवात बाईक रॅली ने केलो या दरम्यानच युवा शाखेच मंडल ४ मध्ये उद्घाटन केले. विविध कार्यक्रम एकामागोमाग झाले घरोघरी संपर्क अभियान सम्राट कॉलनी मंडल ७ नवमतदार नोंदणी शिबिर श्यामा फायर जवळ मंडल ८, नवमतदार नोंदणी शिबिर RTO ऑफिस जवळ मंडल ९, युवती शाखा, युवा खेळाडू असे कार्यक्रम झाले.

यावेळी जळगांव शहराचे आमदार व ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजुमामा भोळे महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, प्रदेश सरचिटणीस योगेश माईंद, कुशल भापसे, भा.ज.यु.मो.जळगाव महानगर प्रभारी अनिकेत पाटील भा.ज.यु.मो. जळगाव महानगर प्रभारी, भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष, विजय बंचोडे, किरण बोराडे, कपिल पाटील, प्रदेश सचिव भैरवीताई वाघ प्रदेश सचिव, योगेश गोंदकर अमित सोळुंखे, सोशल मीडिया सह संयोजक, आनंद सपकाळे जिल्हाध्यक्ष महानगर भाजपा युवा मोर्चा, श्रीकांत महाजन जिल्हाध्यक्ष ग्रामीण भाजपा युवा मोर्चा, जळगाव सरचिटणीस अक्षय जेजुरकर, मिलिंद चौधरी, जितेंद्र चौथे नगरसेवक राजेंद्र घुगे पाटील, जितेंद्र मराठे तसेच सर्व भाजपा लोकप्रतिनिधी, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

शहरात विविविध कार्यक्रम आयोजित केले असून यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार घालून विकास तीर्थ बाईक उत्स्फूर्त पणे रॅली पूर्ण जळगाव शहर भर झाली. तसेच ब्राम्हण सभेत रॅली संपन्न करून युवा संवादाचा कार्यक्रम घेत युवकांशी संवाद साधला तसेच मिसा बंधूंचा सत्कार देखील याठिकाणी राहुल भैया यांच्या हस्ते केला व घर चलो अभियान शाखा उदघाटन, युवती शाखा, नवमतदार नोंदणी तसेच असंख्य कार्यकर्त्यांसह कार्यक्रम संवाद साधला तसेच सर्व सन्मानीय भाजपा लोकप्रतिनिधी, प्रदेश पदाधिकारी, सर्व आघाडी अध्यक्ष, भाजपा जिल्हा पदाधिकारी, मंडल पदाधिकारी, युवा मोर्चा जिल्हामंडलशाखा पदाधिकारी उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.