भारतीय मान्सूनवर अल निनोचा प्रभाव राहणार नाही – पंजाबराव डख यांचा दावा

0

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क
चार-पाच दिवसांपूर्वी अमेरिकेच्या हवामान विभागाकडून भारतीय मान्सून बाबत एक धक्कादायक अहवाल सार्वजनिक करण्यात आला.

या अहवालात वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा भारतात अलनिनो ही हवामान प्रक्रिया सक्रिय राहणार आहे. यामुळे भारतात जून, जुलै, ऑगस्ट या कालावधीमध्ये कमी पाऊस कोसळणार असल्याचे या अहवालात म्हटले आहे.मात्र पंजाबराव यांनी सांगितल्याप्रमाणे भारतीय मान्सूनवर अल निनोचा प्रभाव पाहायला मिळत नाही. अलनिनोमुळे भारतीय मानसून कधीच प्रभावित झालेला नाही.मान्सून हा वेळेतच भारतात दाखल होतो असं पंजाबरावांनी नमूद केल आहे. पंजाबरावांच्या मते अलनिनो असो वा नसो मान्सून हा आपल्या ठरलेल्या वेळेत महाराष्ट्रासह संपूर्ण देशात दाखल होणारच. आपल्या देशाची भूमी ही अशा स्थानी वसलेली आहे ज्या ठिकाणी अलनिनो उद्भवो अथवा न उद्भवो मान्सून आपल्या ठरलेल्या वेळेत म्हणजेच सात जूनलाच देशात प्रवेश करणार.पंजाब रावांनी दिलेल्या माहितीनुसार अल निनो हा साधारणतः डिसेंबर महिन्याच्या सुमारास आतापर्यंत उद्भवला आहे.

यामुळे याचा भारतीय मान्सूनवर कोणताच परिणाम होत नाही. भारतीय मानसून हा जून ते सप्टेंबर या काळात असतो. अशा परिस्थितीत या अल निनो हवामान प्रणालीचा भारतीय मानसून वर परिणाम होणार नसल्याचे मत पंजाबराव डख यांनी वर्तवले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.