‘रक्षाबंधन’ चित्रपटाचं नव गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

सुप्रसिद्ध बाॅलीवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या चित्रपट रक्षाबंधनच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. रक्षाबंधनचे ट्रेलर तर ट्रेलर मात्र गाणे देखील प्रेक्षकांना भावले आहे. सोशल मीडियात गाण्यांना भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या दरम्यान चित्रपटाचे नवे गाण ‘डन कर दो’ प्रदर्शित करण्यात आले आहे. यात अक्षय कुमार देवीच्या जागरणाचा मनसोक्त आनंद घेताना दिसून येत आहे. गाण्यांनी मन जिंकल्याने चित्रपट दमदार कमाई करेल हे आता निश्चित झाले आहे.

या पूर्वीच चित्रपटाचं गाण ‘कंगन रुबी वाला’ प्रदर्शित झालं होतं. यात अक्षय कुमारबरोबर भूमी पेडणेकर यांची जोरदार केमिस्ट्री रंगल्याचे बघावयास मिळाले. गाणे इरशाद कामिल यांनी लिहिले असून हिमेश रेशमियाने गीत गायले आहे. रक्षाबंधन हे सोशल मीडिया ड्रामा आहे. या चित्रपटात अक्षय कुमार सोबतच भूमी पेडणेकर, सहजमीन कौर, दीपिका खन्ना, सादी खतीब आणि स्मृती श्रीकांत यांची महत्त्वाची भूमिका आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.