अजित पवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभा विरोधी पक्षनेते मा.ना.श्री. अजितदादा पवार यांचा ६३ वा वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्रात आज दि. २२ जुलै रोजी उत्साहात, विविध सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. जळगांव शहर महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, सामाजिक न्यायचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश बाहे, आदिवासी सेलचे इब्राहिम तडवी यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील गरजु व गरीब १२५ विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.

यानंतर जळगांव शहरातील कृष्णसखी बहुउद्देशिय बचत गटाच्या अध्यक्ष रुपाली बाविस्कर व त्यांच्या महिला सहकारी यांचा सत्कार करण्यात आला. यादरम्यान कार्यालय आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, आमदार मनिष जैन, वाल्मिक पाटील, अशोक लाडवंजारी, मिनाक्षी चव्हाण, अशोक पाटील, रिंकू चौधरी, सुनिल माळी, अॅड. राजेश गोयल, राजू मोरे, चंद्रमणी सोनवणे, सुशिल शिंदे, किरण राजपूत, अशोक सोनवणे, रहिम तडवी, विशाल देशमुख, भगवान सोनवणे, अकिल पटेल, गोटू चौधरी, जितु बागडे, संजय जाधव, राहुल टोके किरण चव्हाण, सतीश चव्हाण, आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार इब्राहिम तडवी यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.