गोष्ट एका पैठणीची हा मराठी सिनेमा उत्कृष्ट सिनेमा ठरला… 68 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क;

यंदा राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचं 68 वे वर्ष असून, 68 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा दिल्लीतील नॅशनल मीडिया सेंटर येथे आयोजित पार पडला. कलाकार आणि सिनेसृष्टीशी निगडीत मंडळी ज्या क्षणाची आतूरतेने वाट पाहत असतात तो पुरस्कार म्हणजे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार.

कलाकारांना त्यांच्या उत्कृष्ट कामासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं. शास्रीय गायक राहूल देशपांडेला मी वसंतराव या चित्रपटाच्या पार्श्वगायनासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. तर बेस्ट ज्युरी फिचर फिल्मसाठी ‘जून’ साठी सिद्धार्थ मेनन व ‘अवांचित’ आणि ‘गोदकथा’ या दोन मराठी सिनेमांसाठी किशोर कदम यांना पुरस्कार प्राप्त झाला आहे.

गोष्ट एका पैठणीची हा मराठी सिनेमा उत्कृष्ट सिनेमा ठरला आहे. याचे दिग्दर्शक शंतनू रोडे असून अभिनेत्री सायली संजीव हिनं मुख्य भूमिका साकारली आहे. तर नॉन फिचर्स फिल्ममध्ये कुंकूमार्चन या मराठी सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

अपर्णा भानुशाली हिला सुराराई पोत्रु साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर, तानाजी दि अनसंग वारियर साठी अजय देवगन व  सुराराई पोत्रु साठी सूर्या यांना अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार विभागून देण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.