अजय देवगण पुन्हा दिसणार दमदार भूमिकेत, अगामी “भोला” चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) हा त्यांच्या भूमिकांना घेऊन खूपच सिरिअस असतो. सिंघम, सिंघम रिटर्न्स, तानाजी, अश्या भूमिका त्याच्या खूप गाजल्या आणि आता पुन्हा नव्या दमदार भूमिकेत अजय आपल्याला पाहायला मिळणार आहे. “भोला” (Bhola) चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळत होती. अजय देवगण याच्या दृश्यम 2 (Drishyam 2) चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर धमाल केली होती. कोरोनानंतर सर्वाधिक कमाई करणारा सर्वात अगोदर दृश्यम 2 हा चित्रपट ठरला. बाॅलिवूडच्या चित्रपटांकडे प्रेक्षक पाठ फिरवत असताना बाॅक्स आॅफिसवर (Box office) तूफान कामगिरी करण्यात दृश्यम 2 ला यश मिळाले. आता अजय देवगण याच्या भोला चित्रपटाकडून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा नक्कीच आहेत.

आता नुकताच भोला चित्रपटाचा धमाकेदार 3D ट्रेलर रिलीज झालाय. हा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर चाहत्यांमधील उत्साह वाढल्याचे दिसत आहे. अजय देवगण याने रविवारी घोषणा केली होती, भोला चित्रपटाचे ट्रेलर उद्या चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.भोलाच्या रिलीज झालेल्या ट्रेलरमध्ये अजय देवगण याचा लूक जबरदस्त दिसत आहे. विशेष म्हणजे या ट्रेलरला चाहत्यांचे प्रचंड प्रेम मिळताना देखील दिसत आहे. आज 6 मार्च रोजी या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.