मोठी बातमी; मस्कट येथे एअर इंडियाच्या विमानाला आग… सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले…

0

 

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क:

एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाला मस्कट विमानतळावर आग लागली. विमानातून धूर निघत असताना विमानातील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. विमानात चार नवजात मुलांसह 145 प्रवासी होते. सर्व प्रवाशांना टर्मिनल इमारतीत हलवण्यात आले आहे. यादरम्यान एकाही प्रवाशाला दुखापत झाली नाही. हे विमान मस्कटहून कोचीला येत होते.

विमानाने उड्डाण घेण्याच्या काही क्षण आधी आग लागल्याची माहिती मिळाली.

Leave A Reply

Your email address will not be published.