आरोग्यासाठी योगासन करणे आवश्यक; शुभम महाजन

0

ऐनपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,सरदार वल्लभभाई पटेल पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यामंदीर, ऐनपूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्त दि. २१ जून बुधवार रोजी शाळेत “आंतरराष्ट्रीय योग दिन ” साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक शुभम महाजन यांनी विद्यार्थ्यांना योगासनाविषयी माहिती दिली. शरीर सुदृढ व निरोगी ठेवण्याविषयीचे विद्यार्थ्यांना त्याचे उपयोग व महत्त्व पटवून सांगितले. व दररोज योगासन केल्याने आपले आरोग्य निरोगी व चांगले राहते असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.व योगासनाची प्रात्यक्षिके स्वतः विद्यार्थ्यांना करुन दाखवली. याप्रसंगी शाळेचे सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शिक्षकांनी व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी योगासने केली. विशेषत: शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुद्धा योग दिनात आपला सक्रिय सहभाग नोंदविला.

Leave A Reply

Your email address will not be published.