अभिनेत्री तेजश्री प्रधानला मातृशोक…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

मराठी मालिका आणि चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री तेजश्री प्रधान हिच्या आईचं दि. १६ नोव्हेंबर रोजी निधन झाल्याची बातमी समोर येत आहे. तेजश्रीच्या आईचं नाव सीमा प्रधान असं असून मुंबई येथील राहत्या घरी त्यांचं निधन झाल्याचं सांगण्यात येत आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सीमा प्रधान यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून ठीक नव्हती. त्या आजारपणामुळे अंथरुणाला खिळून होत्या. त्यांना नेमका काय आजार होता, हे अद्याप समजू शकलेलं नाही. आईच्या जाण्याने तेजश्रीला मोठा धक्का बसला आहे. सीमा प्रधान यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर तेजश्री अनेक चाहत्यांनी सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करुन तिचे सात्वंन केले. तसेच अनेक मराठी सेलिब्रेटींनीही शोक व्यक्त केलं आहे.

झी मराठी टेलिव्हिजन मालिका अग्गाबाई सासूबाई (2019) आणि होनार सुन मी या घरची (2013) मधून तेजश्री प्रधानला मोठी प्रसिद्धी मिळाली.

Leave A Reply

Your email address will not be published.