Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना विरोधकांनी घेरले!
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जिल्ह्यात आचारसंहितेची कडक अंमबजावणी ; 24 लाखापेक्षा जास्त मद्य जप्त
    उत्तर महाराष्ट्र

    जिल्ह्यात आचारसंहितेची कडक अंमबजावणी ; 24 लाखापेक्षा जास्त मद्य जप्त

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 11, 2024No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगांव ;- जिल्ह्यातील रावेर व जळगाव लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहिता संदर्भात प्रशासनाने विविध माध्यमातून कार्यवाही करणे सुरू केले असून त्यात शस्त्र जप्ती, रोख रक्कम, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान धातू याबाबतची तपासणी सुरू केली आहे.

    जिल्ह्यात एकूण 1323 परवानाधारक शस्त्र असून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शस्त्र जमा करण्याचे आदेश जारी झाल्यानंतर आज पर्यंत 985 शस्त्र विविध पोलीस ठाण्यांमध्ये जमा करण्यात आले आहेत. तर 115 शस्त्रधारकांना सूट देण्यात आली आहे. चार शस्त्र जप्त करण्यात आली आहेत. तर दोन परवाने रद्द करण्यात आले आहेत. अद्याप पर्यंत 27 शस्त्र जमा होणे बाकी आहे. सीआरपीसीच्या प्रतिबंधात्मक कलमा अंतर्गत आतापर्यंत 4700 प्रकरणे दाखल करण्यात आले आहेत.तर 3287 जणांना अटक करण्यात आली आहे. मद्य संदर्भातील कार्यवाही आचासंहिता (16मार्च पासून) कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने नोंदविलेल्या गुन्ह्याचा तपशिल खालीलप्रमाणे

    1. एकूण गुन्हे – 136

    2. जप्त मुद्देमाल (लिटर)- 49,252.19

    3. जप्त मुद्देमाल किंमत (रू) – 24,08,865

    जळगाव जिल्ह्यात एकूण 66 तक्रारी प्राप्त झाल्या. यापैकी सत्यता पडताळून 12 तक्रारी वगळण्यात आल्या तर 54 तक्रारीवर विहित काळात कार्यवाही करण्यात आली. जिल्ह्यात कुठेही आचारसंहितेचे उल्लंघन होत असेल तर नागरिकांनी तिथला फोटो काढावा आणि तात्काळ सी व्हिजील अँपवर अपलोड करावा असे आवाहन जिल्हा निवडणूक विभागाकडून करण्यात आले आहे, ती तक्रार प्राप्त होताच विहित कालावधीत त्यावर कार्यवाही होते. अद्याप पर्यंत मीडिया सेल कडे एकूण दोन तक्रारी प्राप्त झालेले आहेत. त्यापैकी दोन्ही तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Strict enforcement of code of conduct in the district; More than 24 lakh liquor seized
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026

    दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी

    October 6, 2026

    बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif