Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    • जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा विळखा अधिकच घट्ट!
    • आईसोबतच्या मैत्रीचा राग; रेल्वे कर्मचाऱ्याला संपवले
    • विद्यानंद बापटांना गणेशोत्सवाच्या काळात पुणे शहरात बंदी?
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»गांजा शेती प्रकरण; आरोपीची कारागृहात आत्महत्या…
    गुन्हे वार्ता

    गांजा शेती प्रकरण; आरोपीची कारागृहात आत्महत्या…

    Tushar BhambareBy Tushar BhambareOctober 3, 2022No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    धुळे, लोकशाही न्यूज नेटवर्क:

    गांजा शेतीप्रकरणातील संशयीत आरोपीने धुळे येथील जिल्हा कारागृहात (District Jail) गळफास घेत आत्महत्या (suicide) केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. शिरपूर (shirpur) तालुका पोलिसांनी (police) सांज्यापाडा फत्तेपूर शिवारातील त्याच्या गांजा शेतीवर नुकतीच कारवाई केली होती. त्यात तब्बल 14 लाखांची पाच ते सहा फुटांची गांजाची झाडे जप्त करण्यात आली होती. जामसिंग जसमल पावरा (70) रा.फत्तेपूर शिवार सांज्यापाडा, ता. शिरपूर असे त्याचे नाव आहे.

    त्याला कारागृहातील बेरेक क्र.2 येथे ठेवण्यात आले होते. पहाटे तीनच्या सुमारास त्याची तपासणी करण्यात आली. मात्र त्यानंतर त्याने शौचालयात कपड्याच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब लक्षात येताच कारागृह कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांसह पोलिसांना माहिती दिली. याबाबत माहिती मिळताच न्यायाधीश, उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे, धुळे शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. तसेच मयत पावरा यास जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले.

    गांजा शेतीप्रकरणी जामसिंग पावरा याला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच त्याला दि. 30 सप्टेंबर रोजी न्यायालयीन कोठडी देण्यात आली. धुळे जिल्हा कारागृहात त्याची रवानगी करण्यात आली होती.

    #crime #dhule #drugs #ganja #jail #jalgaon Suicide
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा

    September 11, 2026

    एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे

    September 11, 2026

    अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!

    September 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif