पुण्यात स्कुल बसचा भीषण अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क

पुण्यात स्कुल बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. भरधाव बस झाडावर आदळली आहे. अपघात झाला त्यावेळी शाळकरी मुले देखील बामध्ये होते. यात काही विद्यार्थी जखमी झाले आहे. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेचा थरकाप उडवणारा सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील वाघोली रायझिंग स्टार या शाळेची ही बस होती. सोमवारी ४ डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे बस विद्यार्थ्यांना घेऊन निघाली होती. मात्र वाटेतच ही बस झाडावर जाऊन आदळली. अपघातानंतर मोठा आवाज झाला, त्यानंतर आजूबाजूचे लोक तातडीने मुलांच्या मदतीसाठी धावले.

अचानक घडलेल्या घटनेनंतर विद्यार्थी मोठमोठ्याने रडत होते. मात्र उपस्थित नागरिकांनी त्यांना धीर देऊन शांत करण्याचा प्रयत्न केला. काही जखमी विद्यार्थ्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने कुणालाही गंभीर इजा झाली नाहीये.

बसची धडक इतकी जोरदार होती की समोरील भाग चक्काचूर झाला आहे. अपघाताचं कारण अद्याप स्पष्ट समोर आलेलं नाही. मात्र बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात बस चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.