अभिनव प्राथमिक सराव पाठशाळेत सावित्रीबाई फुलेंची जयंती साजरी

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

अभिनव प्राथमिक विद्यालयात भारतातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका वैशाली राठोड व शारदा धांडे व शाळेचे मुख्याध्यापक ललित नेमाडे, जिंदगी फाउंडेशनच्या अध्यक्षा सुश्मिता भालेराव व अजय पाटील यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

तसेच बालिका दिन म्हणून शाळेतील विद्यार्थिनींच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याविषयी भाषण दिले. अजय पाटील व सुष्मिता भालेराव यांनी सावित्रीबाईंच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिता तळले यांनी केले. आभार प्रदर्शन स्नेहल ठाकूर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील प्रवीण वायकोळे, उमेश चौधरी, ज्योती इंगळे यांचे सहकार्य लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.