राज्यासह जिल्ह्यातील आशा सेविकांना मिळणार मोबाईल…

0

 

मनवेल, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

राज्यासह जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांना आभाकार्ड तसेच आयुष्यमान कार्ड आणि पीएमजेएवाय केवायसीसह अन्य ऑनलाईन पद्धतीची कामे देण्यात आली आहेत.

परंतु वरील कामे करण्यासाठी आशा स्वयंसेविकाकडे कोणतीही साधने नसल्यामुळे या कामांना विरोध करण्यात आला. याची दखल घेत नागपूर जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांना नावीन्यपूर्ण योजनेतून (Disctrict Minning Fund) अँड्रॉइड मोबाईल पुरविण्याबाबत जिल्हा परिषदेने शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता, सदर प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे.

त्यानुषंगाने नागपूर जिल्ह्याच्या धर्तीवर राज्यातील जिल्हा परिषदांनी आशा स्वयंसेविकांना अँड्राईड मोबाईल द्यावेत असे आदेश सुभाष बोरकर, सहसंचालक (अतांत्रिक) राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई. यांनी २२ सप्टेंबर २०२३ रोजी राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिले आहेत.

त्यामुळे राज्यासह जळगांव जिल्ह्यातील आशा सेविकांना ऑनलाईन कामांसाठी अँड्राईड मोबाईल मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हे संघटनेच्या पाठपुराव्याला आलेले यश आहे. असे असले तरी आशा सेविकांना डाटा रिचार्ज साठी दरमहा १०० रुपये दिली जाणारी रक्कम अत्यल्प आहे. ती वाढविण्यासह अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर आशा सेविकांना भाऊबीज भेट मिळावी, तसेच अन्य प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी संघटना आगामी काळात लढा व पाठपुरावा करणार असल्याची माहिती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.