गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची जैन इरिगेशन येथे औद्योगिक सहल

0

जळगाव – दरवर्षी प्रमाणे गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनीरिंग मधील विद्यार्थ्यांची औद्योगिक वसाहतीत विविध औद्योगिक प्रकल्पाना भेट होत असते, या अनुषंगाने गोदावरी अभियांत्रिकी विद्यालयातील विद्युत अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी २४ मे २०२३ रोजी शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते.

इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग च्या विद्यार्थ्याचे सर्वांगीण विकास हा लक्षात घेऊन त्यासाठी आवश्यक त्या बाबींची पूर्तता व्हावी यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. विद्यार्थ्यानी थेअरी सोबत कॅम्पस बाहेरील जगात विविध घडामोडींचे व विषयासंबंधित ज्ञान मिळावे हि संकल्पना लक्षात ठेऊन औद्योगिक वसाहतींना भेटीचे आयोजन केले जाते. इलेक्ट्रिकल चे विविध विषय लक्ष्यात ठेऊन या विभागातर्फे जगभर प्रसिद्ध असलेल्या जैन इरीगेशन या नामांकित इंडस्ट्रीला भेट देण्यात आली, या भेटी साठी इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग चे विद्यार्थी व शिक्षक हे उपस्थित होते.

जैन इरीगेशन या इंडस्ट्रीला भेट देतांना सोलर पॅनल मॅनुफॅक्चरिंग, कंट्रोलर, इङऊउ मोटर, फूड प्रोसससिंग प्लांट , मँगो, ओनियन, व्हेजिटेबल्स पॅकेगिंग, फ्रुट्स मॅनुफॅक्चरिंग, टिशू कल्चर प्लांट अशा विविध विभागांना भेट देण्यात आली. या विभागांना भेट देतांना कंपनीतील अधिकारी हे विद्यार्थ्यांना सर्व माहित देत होते आणि विविध प्रोसेस समजावून सांगत होते. या वेळी अभियांत्रिकी विभागातून प्रा. नेमीचंद सैनी यांनी या औद्योगिक भेटीचे आयोजन केले. तसेच प्रा. अमित म्हसकर हे सुद्धा या भेटीसाठी उपस्थित होते. या भेटीसाठी जैन इरीगेशन तर्फे तमस पटेल यांनी भेटीसाठी आवश्यक परवानगी व इतर बाबीसाठी सहकार्य केले. तसेच गोदावरी अभियांत्रिकी विद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी मार्गदर्शन केले. उपप्राचार्य प्रवीण फालक व इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग विभागाचे प्रमुख प्रा. महेश पाटील यांनी इंडस्ट्रियल व्हिझिट साठी सहकार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.