“वेडात मराठे वीर दौडले सात” चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अपघात

0

कोल्हापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

‘प्रवीण तरडे’ (Pravin Tarde)  हे आज आजकाल आपण सर्वच जास्त ऐकत आहोत असं म्हंटले तर वावगं ठरणार नाही. प्रवीण तरडे ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने उत्तम कथा लिहतात, डिरेक्शन करतात, त्याच पद्धतीने ते आपल्या अभिनयांत देखील तेवढेच पारंगत आहे. अनेक ऐतिहासिक भूमिकेत ते आपल्या दिसले होते आणि आता ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ ह्या चित्रपटात ते आल्याला पुन्हा नव्या भूमिकेत बघायला मिळणार आहे. गेले काही दिवस ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाची बरीच चर्चा होती. हा चित्रपट मध्यंतरी वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. आता या चित्रपटावर नवे संकट ओढवले आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण कोल्हापुरात पन्हाळा परिसरात सुरू असताना एक तरुण फोटोग्राफर दरीत कोसळला आहे.

कोल्हापूरमधील पन्हाळगडावर एक दुर्घटना घडली आहे. चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर फोटोग्राफी करताना किल्ले पन्हाळगडावरील सज्जा कोठीवरून एक तरुण दरीत पडला आहे. शनिवारी 18 मार्च रोजी रात्री 9.15 च्या सुमारास ही घटना घडली. नागेश तरडे असे दरीत पडलेल्या तरुणाचे नाव असून, तो गंभीर जखमी आहे. आगामी मराठी चित्रपट ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाचे सध्या किल्ले पन्हाळगडावर शूटिंग सुरू आहे. शूटिंग संपल्यानंतर नागेश हा तरुण मावळ्याच्या वेशात होता. यावेळी तो फोटोग्राफीसाठी सज्जा कोठीच्या तटबंदीवर चढला. त्यावेळी पाय घसरून तो दरीत पडला. त्याची प्रकृती गंभीर असून, उपचार सुरू आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.