धक्कादायक.. १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी अत्याचारातून गर्भवती

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढतांना दिसत आहेत. जळगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारातून गर्भवती झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. याबाबत मंगळवारी २२ फेब्रुवारी रोजी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील एका गावात राहाारी १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या नातेवाईकांसह वास्तव्याला आहे. १५ नोव्हेबर ते १० नोव्हेबर २०२१ दरम्यान अल्पवयीन मुलाने पीडीत मुलीशी जवळीक साधुन दोन वेळा अत्याचार केला. या अत्याचारातून पिडीत मुलगी गर्भवती राहीली. मंगळवारी २२ फेब्रुवारी रोजी सकाळी पडित मुलीच्या पोटात दुखायला लागले तेव्हा तिच्या पालकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी आणले असता हा धक्कादायक प्रकार समोर आला.

यासंदर्भात पीडित मुलीला नातेवाईकांनी विश्वासात घेवून विचारपूस केली असता आपल्यावर मुलाचे नाव सांगून त्याने दोन वेळा अत्याचार केल्याचे सांगितले. पीडीत मुलीच्या नातेवाईकांनी पिडीतेसह एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून रात्री ९ वाजता तक्रार दाखल केली. सदर तक्रारीवरून पोक्सो कायद्यांर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गिरासे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.