कोळवद येथिल खळ्यात आगिचे तांडव

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
यावल – तालुक्यातील कोळवद येथील शेतकरी यांच्या नदी काठावरील खळयाला अचानक आग लागुन सुमारे पत्र्याचे शेड व शेती अवजारे, रुपयांचा गुरांचा चारा, ठीबक नळया जळुन , पीव्हीसी पाईप , कापुसअसा अकरा लाख रुपयांचे साहित्य भिषण आगीत जळुन खाक झाल्याची घटना घडली असुन , यावेळी अग्नीशमन दल व ग्रामस्थांच्या मदती मोठया परिश्रमानंतर ही आग विझविण्यात आली आहे .
यावल तालुक्यातील कोळवद येथे काल रात्री १o वाजेच्या सुमारास दिनांक१६ जानेवारी रोजी खडकी नदीच्या काठावर असलेल्या शेतकरी परेश रविन्द्र चौधरी यांच्या खळ्याला अचानक भिषण आग लागल्याची घटनासमोर आली असुन , या अचानक लागलेल्या आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे . आज घटनास्थळी मंडळ अधिकारी व तलाठी पंचनाम्यासाठी जात पहोचत आहे.आग कशामुळे लागली हे मात्र अद्याप स्पष्ठ झाले नाही . या संदर्भात परेश चौधरी यांनी यावल पोलीस ठाण्यात खबर दिल्याने नोंद करण्यात आली आहे . रावेर ,यावल विधानसभा क्षेत्राचे आ शिरीष चौधरी यांनी कोळवद येथे आगीत नुकसान झालेल्या शेतकरी कुटुंबाची भेट घेवुन त्यांचे सांत्वन केले यावेळी त्यांच्या सोबत कॉंग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रभाकर सोनवणे व आदी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते .

Leave A Reply

Your email address will not be published.