एका दलित तरुणाला चप्पलने मारहाण दोघांवर गुन्हा दाखल… (व्हिडीओ)

0

 

मुझफ्फरनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क;

दलित अत्याचाराच्या घटना वाढत असून त्यात भर म्हणून अजून एका व्यक्तीला मारण्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये एका दलित तरुणाला चप्पलने मारहाण केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पोलिसांनी शनिवारी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश कुमार (२७) या दलित व्यक्तीला ताजपूरचे ग्रामप्रमुख शक्ती मोहन गुर्जर आणि रेटा नागला गावचे माजी ग्रामप्रमुख गजे सिंग यांनी चप्पलने मारहाण केली आणि त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली.

पोलिस अधीक्षक (शहर) अर्पित विजयवर्गीय यांनी पत्रकारांना सांगितले की, दोन्ही व्यक्तींवर भारतीय दंड संहिता (आयपीसी) आणि एससी/एसटी अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावप्रमुख शक्ती मोहन याला पोलिसांनी अटक केली असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

या घटनेच्या निषेधार्थ भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी दलित समाजाच्या सदस्यांसह छपर पोलीस ठाण्याबाहेर धरणे आंदोलन करून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली. पोलिसांनी परिसरात कडक बंदोबस्त ठेवला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.